Dream 11 Online Gaming Bill 2025: ऑनलाईन गेमिंगबाबत विधेयक मंजूर (Online Gaming Bill 2025) होताच अनेक गेम्सने रिअल-मनी गेम्स थांबवण्यात आले आहेत. याचदरम्यान, ऑनलाईन गेमिंग विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ड्रीम इलेव्हनमध्ये (Dream 11) आता पैसे लावून कॉन्टेस्ट खेळता येणार नाहीय. ऑनलाईन गेम प्रचार आणि नियमन विधेयक 2025 नुसार ड्रीम इलेव्हन आपल्या युजर्सला सूचना जारी केल्या आहेत.
कॅश गेम आणि कॉन्टेस्ट या ड्रीम इलेव्हनमधून बंद करण्यात आले आहेत, त्यासोबतच युजर्स जिंकलेले पैसे आणि डिपॉझिट बॅलेन्स हे सुरक्षित असून ते आपण कधीही काढू शकता, असं सुद्धा ड्रीम 11 कडून सांगण्यात आला आहे. त्यामुळे आता करोडो ड्रीम इलेव्हन युजर्स ड्रीम इलेव्हन कॅश कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत किंवा ड्रीम इलेव्हनमध्ये पैसे लावू शकणार नाहीत. ड्रीम 11 च्या जवळपास 28 करोड युजर्स असून 9600 कोटींच्या जवळपास रिवेन्यू आहे. देशातील टॉपच्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्ममध्ये ड्रीम इलेव्हनचा समावेश आहे. मात्र आता कॅश कॉन्टेस्ट न खेळता फ्री कॉन्टेस्टचा ऑप्शन ड्रीम इलेव्हनकडून ठेवण्यात आला आहे.
संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर-
संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक (Online Gaming Bill 2025) मंजूर झालं आहे. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर काल (21 ऑगस्ट) राज्यसभेतही विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. दरम्यान आता हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी पाठवण्यात येईल.
बीसीसीआयलाही बसणार फटका-
सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आलेली ड्रीम-11 गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्येही सक्रिय झाली होती आणि परिणामी 2023 मध्ये ड्रीम-11 ने बीसीसीआयसोबत 358 कोटी रुपयांचा करार केला. या करारामुळे ही कंपनी भारतीय क्रिकेट संघाची टायटल प्रायोजक बनली आणि तेव्हापासून टीम इंडियाच्या जर्सीवर ड्रीम-11 चे नाव लिहिले गेले आहे. हा करार 3 वर्षांसाठी होता जो 2026 मध्ये संपणार आहे. पण त्याआधीही हे विधेयक मंजूर झाल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. बीसीसीआय आणि ड्रीम-11 मधील या कराराला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला 358 कोटी रुपयांच्या निम्म्याहून अधिक रक्कम आधीच मिळाली आहे, परंतु उर्वरित रक्कम हा करार पूर्ण होतो की नाही यावर अवलंबून असेल.
संबंधित बातमी:
राज्यसभेतही ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर; लोकसभेत 120 तासांऐवजी फक्त 37 तास चर्चा, 12 विधेयके मंजूर