Delhi Primier Leauge South Delhi Superstarz T20 Records : टी-20 क्रिकेटमध्ये मोठा धमाका पाहिला मिळाली आहे. दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्ये शनिवारी दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांचा इतका पाऊस पडला की सर्व रेकॉर्ड उद्ध्वस्त झाले. दक्षिण दिल्लीचा फलंदाज आयुष बडोनीने शानदार फलंदाजी करत 65 चेंडूत 8 चौकार आणि 19 षटकार ठोकले आणि 300 च्या स्ट्राईक रेटने 165 धावा केल्या. त्याच्यासोबत प्रियांश आर्यनेही दुसऱ्या टोकाला धुमाकूळ घातला. प्रियांशने 50 चेंडूत 10 चौकार-10 षटकार मारले आणि 240 च्या स्ट्राइक रेटने 120 धावा केल्या. यासह दोन्ही फलंदाजांनी आपल्या तुफानी खेळीने दक्षिण दिल्लीची धावसंख्या 308 धावांवर नेली. या सामन्यात तुफानी खेळीने अनेक विक्रम केले.


सर्वात मोठी भागीदारी


टी-20 क्रिकेटमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. प्रियांश आर्य आणि आयुष बडोनी यांच्यात 286 धावांची भागीदारी झाली, जी टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही जोडीने केलेली सर्वात मोठी भागीदारी आहे. या दोन्ही फलंदाजांनी यामामोटो लेक आणि काडोवाकी फ्लेमिंग या जपानी फलंदाजांचे विक्रम मोडीत काढले. ज्यांच्या नावावर चीनविरुद्ध 258 धावांचा विक्रम होता. 15 फेब्रुवारी 2024 रोजी त्याने हा विक्रम केला होता.






टी-20 मध्ये भारतीय फलंदाजाच्या सर्वाधिक धावा


आयुष बडोनी कोणत्याही फ्रेंचायझी लीगच्या एका डावात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. हा एकूण विक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. ज्याने आयपीएलमध्ये आरसीबीकडून पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना 66 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 17 षटकार मारले.






सर्वाधिक षटकार


आयुष बडोनीने टी-20 क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 19 षटकार ठोकले. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने एका डावात इतके षटकार मारलेले नाहीत. फ्रँचायझी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. 2017 च्या बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) फायनलमध्ये गेलने 18 षटकार मारले होते. एस्टोनियन फलंदाज साहिल चौहाननेही सायप्रसविरुद्ध 18 षटकार ठोकले आहेत.






एका डावात सर्वाधिक धावा


दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स संघाने फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. आतापर्यंत कोणत्याही संघाने फ्रँचायझी क्रिकेटमध्ये 300 चा टप्पा ओलांडला नव्हता. दक्षिण दिल्लीने 308 धावा करत सनरायझर्स हैदराबादचा विक्रम मोडला. ज्याने 15 एप्रिल 2024 रोजी आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 287 धावा केल्या होत्या. मात्र, टी-20 इंटरनॅशनलचा विक्रम थोडक्यात बचावला. नेपाळने मंगोलियाविरुद्ध 314 धावा करून हा विक्रम केला होता. या सामन्यात 500 हून अधिक धावांचा विक्रमही झाला.






6 चेंडूत 6 षटकार


दक्षिण दिल्लीचा फलंदाज प्रियांश आर्यने एका षटकात सलग 6 षटकार ठोकले. यासह, तो एका षटकात 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या एलिट यादीत सामील झाला. या यादीत युवराज सिंगसोबतच हर्षल गिब्स, किरॉन पोलार्ड, जसकरण मल्होत्रा, दीपेंद्र सिंग ऐरी यांचीही नावे आहेत.


हे ही वाचा :


राजधानीत षटकारांचं वादळ; युवराज सिंगसारखेच ठोकले 6 चेंडूत 6 षटकार, तुम्ही एकदा व्हिडिओ पाहाच