Virat Kohli-Gautam Gambhir Viral Video : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 280 धावांनी जिंकला. आता मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर हा सामना होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोन दिग्गज एकमेकांना किस करताना दिसत आहेत. पण व्हिडिओचे सत्य जाणून तुम्हाला धक्का बसेल.


काही महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि गौतम गंभीर आपण त्याच्यातील भांडणावर बोलायचो, पण आता बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये दोघेही एकमेकांची मुलाखत घेत होते आणि एकमेकांचे कौतुक करत होते. एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये विराट कोहली मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला किस करताना दिसत आहे. 


कोहलीने खरंच गंभीरला केले किस?


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानावर दिसत आहेत. त्याच्या आजूबाजूला टीम इंडियाचे इतर खेळाडू आहेत, दरम्यान कोहली मुख्य प्रशिक्षक गंभीरला पकडतो आणि किस करतो. पण खरंतर हा व्हिडिओ खोटा आहे. जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. एबीपी माझा या व्हिडिओमध्ये जे दाखवले आहे ते पूर्णपणे बनावट असल्याची पुष्टी करत आहे.






खरंतर, विराट कोहली आणि गौतम गंभीर सध्या खूप एकत्र दिसत आहेत. दोघेही कानपूर विमानतळावर एकत्र स्पॉट झाले होते. अचानक एवढी जवळीक पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. पण, विनोद करताना असा व्हिडिओ बनवणे अजिबात योग्य नाही. चाहत्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे.


भारत-बांगलादेश दुसरी कसोटी


भारत-बांगलादेश कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारपासून दुसरा सामना सुरू होणार आहे. टीम इंडियाने कानपूरमध्ये आतापर्यंत एकूण 23 कसोटी खेळल्या आहेत. 7 सामन्यात विजय तर 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. उर्वरित 13 सामने अनिर्णित राहिले आहेत.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी टीम इंडियाला अजून 9 कसोटी सामने खेळायचे आहे. त्यापैकी संघाला 5 जिंकावे लागतील. टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने खेळायचे आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या देशात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.