Delhi Capitals Head Coach नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) काही दिवसांपूर्वी रिकी पॉन्टिंगला हेड कोच पदावरुन हटवलं होतं. रिकी पॉन्टिंगनं सात हंगामात दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलं. आता दिल्लीच्या टीमसाठी नव्या हेड कोचचा शोध सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संचालक सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) मुख्य प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दिल्ली कॅपिटल्सकडून गौतम गंभीर सारख्या आक्रमक प्रशिक्षकाचा शोध सुरु केला आहे.  


दिल्ली कॅपिटल्स सौरव गांगुलीला हेड कोच करण्यासाठी इच्छुक नसल्याचं वृत्त न्यूज 18 नं दिलं आहे.  सूत्रांच्या हवाल्यानं प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटलं गेलंय की, सौरव गांगुलीकडे अगोदरच खूप जबाबदाऱ्या आहेत. डायरेक्टर ऑफ क्रिकेट या पदावरुन तो फ्रंचायजीसाठी खूप काही नियोजन करत आहे.  


हेड कोचसाठी गंभीर सारख्या व्यक्तीचा शोध


दिल्ली कॅपिटल्सला एका व्यावहारिक प्रशिक्षकाची गरज आहे. त्या प्रशिक्षकानं आक्रमकपणानं दिल्ली कॅपिटल्ससाठी योजना राबवेल, असं म्हटलं. ज्या प्रकारे गौतम गंभीर आक्रमकपणानं प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडतो तशा प्रशिक्षकाची गरज दिल्लीला आहे. गौतम गंभीर मेंटॉरच्या रुपात यशस्वी ठरला आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खेळाडूंवर गंभीरची नजर असते.  


गौतम गंभीरनं यासंदर्भात बंगाली दैनिक आजकल सोबत बोलताना म्हटलं की माझा का विचार होत नाही, चला पाहूया मी हे करु शकतो की नाही. आपल्याला काही नव्या खेळाडूंना संघात स्थान देण्याची गरज आहे. इंग्लंडचा स्टार जेमी स्मिथला संघात स्थान दिलं पाहिजे. तो येण्यासाठी देखील तयार होता. मात्र, त्यावेळी इंग्लंड भारत दौऱ्यासाठी तयारी करत असेल, असं गंभीर म्हणाला.  


दिल्ली कॅपिटल्सची प्लेऑफची संधी हुकली


आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व रिषभ पंतनं केलं होतं. रिषभ पंतनं अपघातानंतर दीड वर्षानंतर आयपीएलच्या माध्यमातून कमबॅक केलं होतं. दिल्ली कॅपिटल्सनं 7 मॅच जिंकल्या आणि 7 गमावल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सचं नेट रनरेट खराब होतं त्यामुळं त्यांची प्लेऑफची संधी हुकली होती. आता यावेळी दिल्ली कॅपिटल्स नव्या कोचसह मैदानात उतरेल.


संबंधित बातम्या : 



 

गार्डनमध्ये फिरण्यास मनाई होती, म्हणून...; युवा खेळाडूंनी रोहित शर्माची घेतली फिरकी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या स्वागतासाठी विशेष ओपन बस, वडोदरामध्ये जंगी स्वागत, रस्त्यांवर तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ