David Warner : लखनौच्या इकाना स्टेडिअमवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये विश्वछचषकाचा सामना सुरु आहे. श्रीलंकेने दिलेल्या माफक 210 आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि अनुभवी स्टिव्ह स्मिथ स्वस्तात माघारी परतले. मधुशंकाच्या एकाच षटकात दोन्ही फलंदाज तंबूत परतले होते. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर पंचांच्या निर्णायावर नारज दिसला. त्याचा राग कॅमेऱ्यात कैद झाला. त्याने पंचांना शिविगाळ केल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणं आहे. तर काहींनी आयसीसीने त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 



210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी सलामी फलंदाज डेविड वॉर्नर फक्त 11 धावांवर तंबूत परतला. मधुशंकाच्या चेंडूवर डेविड वॉर्नरला एलबीडब्ल्यू देण्यात आले. तिसऱ्या पंचांनीही निर्णय कायम ठेवत वॉर्नर बाद असल्याचे सांगितले. त्यानंतर वॉर्नरला पेव्हेलियनमध्ये परत जावे लागले. पण पंचांनी बाद दिल्यानंतर वॉर्नर जोरात ओरडला अन् काहीतरी पुटपुटला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांच्या मते डेविड वॉर्नर याने शिव्या दिल्या आहेत. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.






























डेविड वॉर्नर तंबूत परतल्यानंतर अनुभवी स्मिथही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. स्मिथलाही खातेही उघडता आले नाही. मधुशंका यानेच त्याला तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. पुन्हा त्यांना पराभवाचा धक्का बसणार की काय? अशी चर्चा सुरु झाली होती. पण मिचेल मार्श आणि इंग्लिंश यांनी अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला गेममध्ये परत आणले.  


वादळी सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाने अवघ्या 209 धावांत रोखले आहे. श्रीलंकेचे 9 फलंदाज फक्त 52 धावांत तंबूत परतले. त्यामुळे श्रीलंकेचा संपूर्ण डाव 43.3 षटकांत 209 धावांत संपूष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून एडम जम्पा याने 4 विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. विश्वचषकातील पहिल्या विजयासाठी ऑस्ट्रेलियापुढे 210 धावांचे आव्हान आहे.