Dhanashree Verma Yuzvendra Chahal Photo Asia Cup 2022: टीम इंडियाचा (Team India) स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हीची नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. धनश्रीने शस्त्रक्रियेनंतरचा तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर तिच्या चाहत्यांसह पती युजवेंद्रनेही प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने धनश्रीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


काय आहे धनश्रीची पोस्ट?


शस्त्रक्रियेनंतरचा फोटो धनश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "यशस्वी शस्त्रक्रिया. प्रत्येक अपयशानंतर यश मिळते. मी परत यायला तयार आहे. तुमचे पण आभार."


चहलने धनश्रीच्या फोटोवर कमेंट केली आहे की, 'लवकर बरी हो वाईफी.' त्याच वेळी, सूर्यकुमार यादवसह अनेक क्रिकेटपटूंनी तिच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. धनश्रीच्या या फोटोला अल्पावधीतच लाखो चाहत्यांनी लाईक केलं आहे.  






 


दोघांच्या ब्रेक-अपच्या चर्चेला आलं होतं उधाण


युजवेंद्र चहल आणि त्याची धनश्री यांच्यात काहीतरी खटकत असून त्यांच्या ब्रेक-अपच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आलं होतं. धनश्रीने सोशल मीडियावर पतीचं चहल नावही काढलं होतं. पण त्यानंतर काही दिवसांपूर्वी धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली, यामध्ये युजवेंद्र आणि ती दोघेही मजा-मस्ती करताना दिसत होते. त्यामुळे त्यांच्या वेगळं होण्याच्या चर्चेला तूर्तास ब्रेक लागल्याचं म्हटलं जात आहे.


भारताचा स्टार फिरकीपटू


युजवेंद्र चहल सध्या आशिया चषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत 246 टी20 सामन्यात 280 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा विचार करता चहलने भारतासाठी 64 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 79 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्यांनी 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. आता या कमाल फॉर्ममुळे चहल आगामी आयसीसी टी20 विश्वचषकातही (ICC T20 WorldCup) सिलेक्ट होऊ शकतो.


चहल विश्वचषकासाठी सज्ज


आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ऑरेंज कॅपवर कब्जा करणारा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चमक दाखवत आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर विरुद्ध संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत.  इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतही त्यानं जबरदस्त प्रदर्शन करून दाखवलं आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 47 धावा खर्च करून इंग्लंडच्या चार महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं. चहलच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं (Brad Hogg) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो, असं ब्रॅड हॉगचं मत आहे. 


हे देखील वाचा-


Asia Cup 2022 : चेन्नई सुपरकिंग्स आणि जाडेजामध्ये वादाची चर्चा, पण CSK ने शेअर केलेली खास पोस्ट पाहाच 


IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' पाच फलंदाजांवर सर्वांची नजर, एकट्याच्या जीवाPAवर जिंकवू शकतात सामना