Yuzvendra Chahal and Dhanashree Verma : भारताचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री चहल (Dhanashree Chahal) यांच्यात काहीतरी खटकत असून त्यांच्या ब्रेक-अपच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आलं होतं. पण आता नुकतच धनश्री वर्मा हिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली असून यामध्ये युजवेंद्र आणि ती दोघेही मजा-मस्ती करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या वेगळं होण्याच्या चर्चेला तूर्तास ब्रेक लागल्याचं म्हटलं जात आहे.
या रीलमध्ये धनश्री आणि युजवेंद्र दोघेही सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. यानंतर धनश्री म्हणते की मी एक महिन्यासाठी माझ्या माहेरच्या घरी जात आहे. हे ऐकून चहल 'तेरी इस्सी अदा पर सनम मुझे तो प्यार आया है' या गाण्यावर नाचू लागतो. या मजेशीर व्हिडिओमध्ये दोघांमध्ये अप्रतिम जुगलबंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोघांमध्ये सध्यातरी सर्व ठिक सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
पाहा व्हिडिओ-
भारताचा स्टार फिरकीपटू
युजवेंद्र चहलने आतापर्यंत 246 टी20 सामन्यात 280 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा विचार करता चहलने भारतासाठी 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्यांनी 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. आता या कमाल फॉर्ममुळे चहल आगामी आयसीसी टी20 विश्वचषकातही (ICC T20 WorldCup) सिलेक्ट होऊ शकतो.
चहल विश्वचषकासाठी सज्ज
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ऑरेंज कॅपवर कब्जा करणारा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चमक दाखवत आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर विरुद्ध संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतही त्यानं जबरदस्त प्रदर्शन करून दाखवलं आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 47 धावा खर्च करून इंग्लंडच्या चार महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं. चहलच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं (Brad Hogg) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो, असं ब्रॅड हॉगचं मत आहे.
हे देखील वाचा-