IPL Media Rights: आयपीएलच्या पुढील पाच हंगामासाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया आज पूर्ण झाली . भारतीय उपखंडासाठी टिव्ही आणि डिजिटल हक्क विकण्यात आले आहेत. हा व्यवहार 43 हजार कोटींमध्ये झाल्याची माहिती समोर आलीय. महत्वाचे म्हणजे, आयपीएल प्रसारण हक्क विकत घेणाऱ्या कंपनींचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.  महत्वाचं म्हणजे, ज्या कंपनीला आयपीएल प्रसारण हक्क प्राप्त होतात, त्यांच्याच टीव्ही किंवा डिजीटल प्लॅटफॉर्मवर आयपीएलचे सामने दाखवले जातात.


ट्वीट-



बीसीसीआयनं आयपीएलच्या पुढील पाच वर्षांच्या प्रसारण हक्कांसाठी कालपासून लिलाव प्रक्रिया सुरु केली होती. या लिलावात अनेक मोठ्या कंपन्यांनी सहभाग दर्शवला होता. आयपीएल प्रसारण हक्कांसाठी डिज्नी स्टार, सोनी नेटवर्क आणि रिलायन्स व्हायकॉम18 आणि झी यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. मात्र, यांपैकी कोणत्या कंपनीनं आयपीएल प्रसारण अधिकार प्राप्त केले आहेत? त्यांचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. 


आयपीएल प्रसारण हक्कांचं वर्गीकरण
पॅकेज ए: भारतीय उपखंड (टिव्ही)- 57 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)
पॅकेज बी: भारतीय उपखंड (डिजिटल)-  48 कोटी (प्रत्येक सामन्यासाठी)


बीसीसीआयनं आयपीएलचे प्रसारण हक्कांची ए, बी, सी, डी या चार वेगवेगळ्या पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ए पॅकेजमध्ये  भारतात दाखविल्या जाणार्‍या आयपीएल सामन्यांचे प्रसारण हक्क टेलिकास्ट केले जातात. तर, पॅकेज बी मध्ये आयपीएल सामन्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं प्रसारण हक्क दिले जातात.


याआधी किती रुपयांना विकले गेले होते प्रसारण अधिकार? 
आयपीएल प्रसारण हक्कांसाठी मागील लिलाव 2017 साली पार पडला होता. त्यावेळी स्टार इंडियानं 2022 पर्यंत साठी प्रसारण हक्क 16 हजार 347.50 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याआधी 2008 मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्कनं 8 हजार 200 कोटी रुपयांची बोली लावत 10 वर्षांसाठीप्रसारण हक्क मिळवले होते. 


हे देखील वाचा-