Rishabh Pant Video : भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. 2022 वर्षाच्या अखेरीस पंतचा अपघात झाला होता. या भीषण अपघातातून पंत थोडक्यात बचावला. त्यानंतर त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. सध्या तो घरीच आराम करत असून दुखापतीतून सावरत आहे. दुखापतीमुळे पंत क्रिकेटपासून दुरावला आहे. क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी पंतला वर्षभराचा कालावधी लागणार आहे. दुखापतीतून सावरत असतानाच पंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अनेकांना इमोशनल करत आहे. अनेक शुभचिंतकांनी पंतला दुखापतीतून सावरण्यासाठी धीर दिलाय. 


ऋषभ पंत आपल्या फिटनेसबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असतो. पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे. पंतने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. स्विमिंग पूलमधील पंतचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हातात स्टीक घेऊन पंत पाण्यात चालत आहे. हा एक थेरपीचा प्रकार असल्याचे जाणकर सांगतात. हा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झालाय. बीसीसीआयनेही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 


पाहा पंतने पोस्ट केलेला व्हिडीओ - 
 






स्विमिंग पूलमध्ये पंत स्टीकच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करत आहे. पंतने अद्याप दुखापतीवर पूर्णपणे मात केलेली नाही. त्याला चालण्यासाठी अद्याप मदत घ्यावी लागले. पंतने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलेय की, 'छोटी गोष्ट, मोठी गोष्ट आणि यामधील प्रत्येक मदतीसाठी सर्वांचा आभारी आहे.' बीसीसीआयनेही पंतचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 






 
पंतच्या या व्हिडीओवर सूर्यकुमार यादव, दिल्ली कॅपिटल्स, रवी शास्त्री यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनीही कमेंट करुन धीर दिला आहे. त्याशिवाय अनेक चाहत्यांनी कमेंट करत पंतला धीर दिला आहे. 






रुरकीला जाताना झाला होता अपघात


ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत प्रथमोपचारासाठी रुरकी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. कार अपघातात ऋषभ पंतच्या कपाळावर दोन कट झाल्याची माहिती बीसीसीआयने मॅक्स हॉस्पिटलला दिली होती. त्याच्या उजव्या पायाचा लिगामेंटलाही गंभाररित्या इजा झाली होती.  याशिवाय पाय, पाठ, अंगठा आणि मनगटात खोली आहे. आता लिगामेंट ऑपरेशनमुळे पंत 6 ते 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.


आणखी वाचा :
IPL 2023 : पंत ते बुमराह, 'हे' स्टार खेळाडू आयपीएलला मुकणार, पाहा संपूर्ण यादी