Ben Stokes : अष्टपैलू बेन स्टोक्सला नुकतेच इंग्लंडने कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले. कर्णधारपद मिळताच बेन स्टोक्सने शतक झळकावलेय. बेन स्टोक्सने काऊंट चॅम्पियनशीपमध्ये  (County Championship Ddivision Two) धावांचा पाऊस पाडलाय.  बेन स्टोक्सने शुक्रवारी  डरहमकडून खेळताना दमदार शतक झळकावलेय. इतकेच नाही तर स्टोक्सने पाच षटकारासह एकाच षटकात 34 धावांचा पाऊस पाडलाय. दोन दिवसाच्या सामन्यात बेन स्टोक्सच्या तुफानी शतकाच्या जोरावर डरहमने सहा बाद 580 धावांवर डाव घोषीत केला. 


डरहमने दुसऱ्या दिवशी तान बाद 339 धावांवर खेळ सुरु केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याआधी बेन स्टोक्स मैदानावर उतरला. अवघ्या दोन तासांच्या आत स्टोक्सने शतकी खेळी केली. मैदानावर धावांचा पाऊस पाडला. स्टोक्सने 88 चेंडूत 161 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 17 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. स्टोक्सने 134 धावा षटकार आणि चौकारांनी जमवल्या. 27 धावा फक्त एकेरी आणि दुहेरी धावा घेत काढल्या... यावरुन त्याच्या विस्फोटक खेळीचा अंदाज लावू शकता. 


बेन स्टोक्सचे फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमधील 20 वे शतक होते. स्टोक्सने अवघ्या वादळी अर्धशतक झळकावलेय. स्टोक्सने झळकावले शतक क्लब क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक होय...






एकाच षटकात 34 धावा - 
डरहमच्या डावातील 117 व्या षटकात स्टोक्सने धावांचा पाऊस पाडला. फिरकीपटू जोस बेकर याच्या षटकात स्टोक्सने सलग पाच षटकार लगावले. अखेरच्या चेंडूवर चौकार गेला.  स्टोक्सने पहल्या पाच चेंडूवर पाच षटकार लगावले.. अखेरच्या चेंडूवर चौकार लगावला. एकाच षटकात सहा षटकार लगावण्याचा विक्रम थोडक्यात हुकला. 


17 षटकारांचा विक्रम -
बेन स्टोक्सने दीड शतकी खेळीमध्ये 17 षटकारांचा पाऊस पाडला. काऊंटी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात 17 षटकार लगावण्याचा विक्रम स्टोक्सच्या नावावर जमा झालाय. ऑस्ट्रेलियाच्या सायमंडसने एकाच डावात 16 षटकार लगावण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम शुक्रवारी स्टोक्सने मोडला. 


30 वर्षीय बेन स्टोक्सने कसोटीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. 79 सामन्यात पाच हजार 61 धावा चोपल्या आहेत. यामध्ये 11 शतक आमि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. यादरम्यान गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. बेन स्टोक्सने 174 विकेट घेतल्या आहेत.