Champions Trophy 2025, IND vs BAN दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश आज आमने सामने येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आणखी एका आयसीसी स्पर्धेत यश मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. भारतापुढं बांगलादेशचं आव्हान आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील  सुरुवात विजयानं करण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल. आजच्या सामन्यात भारतीय संघात कुणाला संधी मिलेल याबाबत चर्चा सुरु आहेत. हे सुरु असतानाच रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजा या तिघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यावरुन चाहत्यांनी अंदाज बांधत रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळणार नाही, असं म्हटलंय. 

मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघात ऑलराऊंड रवींद्र जडेजाला स्थान मिळणार नाही. रवींद्र जडेच्या जागी कुणाला संधी मिळेल याबाबत चर्चा सुरु आहेत. वाँशिंग्टन सुंदर याचं नाव यामध्ये आघाडीवर असून त्याला संधी मिळू शकते. 

रवींद्र जडेजा संघाबाहेर का जाणार?

सोशल मीडियावर भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, रवींद्र जडेजा आणि रोहित शर्माचा फोटो व्हायरल होत आहे. गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजा यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाल्याचा दावा केला जातोय. या फोटोच्या आधारे रवींद्र जडेजाला संघात स्थान मिळणार नाही हा अंदाज बांधला जात आहे.  गौतम गंभीर तीच गोष्ट रवींद्र जडेजाला समजावून सांगत असावा, अशी देखील चर्चा करण्यात येत आहे. 

स्टार स्पोर्टसवर भारताचा माजी फिरकीपटू पीयूष चावलानं बांगलादेशच्या संघात डावखुरे फलंदाज अधिक असल्याचं सांगितलं. त्यामुळं भारतीय संघाला ऑफ स्पिनरची गरज आहे. त्यामुळं रवींद्र जडेजा ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळू शकतं. 

भारत आणि बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीत आज आमने सामने येत आहेत. बांगलादेश विरुद्ध भारताचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे. आतापर्यंत पर्यंत भारतानं 41 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये भारतानं बांगलादेशला 32 वेळा पराभूत केलं आहे. तर, 8 सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, एका मॅचचा निकाल लागू शकलेला नाही. 

भारतानं त्रयस्थ ठिकाणी बांगलादेश विरुद्ध 10 वेळा सामने खेळले आहेत. यामध्ये  8 मध्ये विजय मिळवला तर  2 वेळा पराभव स्वीकारला आहे.   

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ :

रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन), विराट कोहली, हार्दिक पांड्या, केएल राहुल (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर

इतर बातम्या : 

champions trophy india vs Bangladesh: भारत Vs बांग्लादेशच्या सामन्यापूर्वी आनंदाची बातमी, मनसेच्या आंदोलनाला यश; Hotstar वर मराठी कॉमेंट्री सुरु