Lionel Messi Injured: स्टार फुटबॉलपटू आणि अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनल मेसीच्या चाहत्यांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी दुखापतग्रस्त झालाय. तो मंगळवारी (11 ऑक्टोबर 2022) पोर्तुगीज क्लब बेनफिका विरुद्ध चॅम्पियन्स लीगमध्ये फ्रेंच क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) कडून खेळणार नाही. मेस्सीच्या दुखापतीमनं पॅरिस सेंट-जर्मेनपेक्षा अर्जेंटिनाची चिंता वाढवली आहे. गतवर्षी कोपा अमेरिका स्पर्धा जिंकणाऱ्या या संघाची नजर यावेळी विश्वचषकावर असेल. अर्जेंटिनाचा संघ गेल्या 35 सामन्यांमध्ये पराभूत झालेला नाही.


मेसीच्या दुखापतीनं चिंता वाढवली
मेसी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यानं आपला देश अर्जेंटीनासाठी मागील तीन सामन्यात 9 गोल केले आहेत. तर, पेरिस सेंट जर्मेनसाठी त्यानं 13 सामन्यांमध्ये आठ गोल केले आहेत आणि तितकंच गोल असिस्ट केले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मेसीच्या पायाच्या स्नायूंमध्ये ताण आलाय. ज्यामुळं बेनफिकाविरुद्ध सामन्यात तो खेळणार नाही. मेसीचे जगभरात चाहते आहेत. त्याच्या दुखापतीनं चाहत्यांमध्ये निराशा पाहायला मिळाली आहे.  तसेच तो आगामी फुटबॉल वर्ल्डकप खेळणार की नाही? अशाही चर्चांना उधाण आलंय. 


बेनफिकाविरुद्धच्या सामन्यात मेसीला दुखापत
बेनफिकाविरुद्ध मागच्या आठवड्यात खेळण्यात आलेल्या सामन्यात मेसीला दुखापत झाली आहे. पीएसजी आणि बेनफिका यांच्यातील सामना 1-1 नं बरोबरीत सुटला. या सामन्यातही मेसीनं पीएसजीकडून एकमेव गोल केला. मेसीची दुखापत किरकोळ असून तो लवकरच मैदानात परतेल. अर्जेंटिनाचा संघही त्याला लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा देत आहे. मेसी संघाचा प्रमुख खेळाडू आहे. विश्वचषकापूर्वी अर्जेंटिनाचा संघ त्यांच्यासोबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. अशा परिस्थितीत मेस्सी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पीएसजीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. 


मार्सेलविरुद्ध मेसीचं पुनरागमन होण्याची शक्यता
बेनफिकाविरुद्ध सामन्यात मेसीऐवजी प्रेसनेल किम्पेम्बे, नूनो मेंडेस आणि रेनाटो सांचेस हे देखील खेळणार नाहीत. या तिघांनाही दुखापत झालीय. हा सामना फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील पार्क डेस प्रेसेन्स स्टेडियमवर होणार आहे. पॅरिस सेंट-जर्मेन चॅम्पियन्स लीगच्या एच ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर बेनफिका आहे. मेस्सी रविवारी लीग 1 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी मार्सेल विरुद्ध खेळणार असल्याचे सांगितलं जात आहे.


हे देखील वाचा-