Rohit Sharma Press conference : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसह जसप्रीत बुमराहच्या प्रकृतीसह अनेक गोष्टी सांगितल्या. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल सांगितना, कोणत्या खेळाडूंना संधी दिली जाईल आणि कोणत्या खेळाडूंना विश्रांती दिली जाईल, याबाबतही त्याने सांगितले, तर जाणून घेऊया रोहितच्या पत्रकार परिषदेतील खास गोष्टीबाबत


• रोहितने या पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराहबद्दल सांगितले की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याला पाठीचा थोडा त्रास झाल्यामुळे त्याची विश्रांती वाढवली आहे. 
• याशिवाय, आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, त्याने अजून टी-20 क्रिकेट सोडलेले नाही.
• याशिवाय, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्याबाबत बोलताना शर्मा म्हणाला की, दुर्दैवाने ईशान किशन पहिल्या सामन्यात नसणार असून शुभमन गिलला संधी दिली जाईल.


T20 कारकिर्दीबाबत मोठा खुलासा केला


श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत रोहित शर्माचा समावेश न केल्यावर आता त्याला टी-20 संघात स्थान मिळणार नाही, अशा बातम्या पसरू लागल्या. आता रोहितसाठी टी-20 मध्ये पुनरागमन करणे खूप अवघड असेल आणि हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा नियमित कर्णधार बनवले जाईल. मात्र, युवा खेळाडूंना टी-20 मध्ये संधी द्यावी आणि या फॉरमॅटसाठी वेगळा संघ तयार करावा, असा विचार मंडळाकडून केला जात आहे. पण या सर्वादरम्यान मी अजून टी20 क्रिकेट सोडणार नसल्याचा निर्णय घेतल्याचं रोहितने सांगितलं.


शुभमन गिलला संधी मिळेल 


रोहित शर्मानेही ईशान किशन आणि शुभमन गिलबाबत स्पष्टीकरण यावेळी दिले. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “दुर्दैवाने आम्ही ईशानला खेळवू शकणार नाही. आम्हाला गिलला योग्य संधी द्यायला हवी." गिलने आतापर्यंत एकूण 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 57.25 च्या सरासरीने 687 धावा केल्या आहेत. तर ईशानने 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 477 धावा केल्या आहेत.


मधल्या फळीत सूर्या की अय्यर?


याशिवाय सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोणाला वनडे संघात संधी दिली जाईल? हा प्रश्न अजूनही कायम आहे. सध्या सूर्या उत्कृष्ट लयीत आहे. पण दुसरीकडे, श्रेयस अय्यर 2022 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ करताना दिसला. 2022 मध्ये अय्यर हा सर्वोत्तम वनडे फलंदाज होता. त्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल.


वेगवान गोलंदाजीचं काय?


बुमराह बाहेर झाल्यानंतर वनडे सामन्यात मोहम्मद शमीसोबत कोणत्या वेगवान गोलंदाजांचा समावेश केला जाईल? खांद्याच्या दुखापतीनंतर मोहम्मद शमीही पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याच्यासोबत कोण दिसणार? या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे ऑप्शन टीमकडे आहेत. 


हे देखील वाचा-