IND vs SL, ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL)  यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना उद्या अर्थात 10 जानेवारी रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतून पुनरागमन करत आहे. रोहित शर्माने गुवाहाटी वनडेपूर्वी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी पहिल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नसल्याचे रोहित शर्माने स्पष्ट केले. ईशान किशनच्या जागी संघ व्यवस्थापनाने शुभमन गिलवर विश्वास व्यक्त केला असल्याचं शर्मा म्हणाला त्यामुळे सलामीला गिल येणार असं दिसून येत आहे. 

Continues below advertisement

विशेष म्हणजे अलीकडेच ईशान किशनने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी द्विशतक झळकावले, पण तरीदेखील श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला बाहेर बसावे लागणार आहे. ज्यामुळे सलामीला रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीवीर म्हणून मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे. कारण केएल राहुल हा देखील सलामीला एक ऑप्शन आहे.  

बुमराहची विश्रांती वाढवली

Continues below advertisement

याशिवाय जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाही. याबाबत माहिती देताना रोहित शर्मा म्हणाला की जसप्रीत बुमराहला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या नेटवर गोलंदाजी करताना पाठीचा थोडा त्रास जाणवला. यामुळे तो मालिकेला मुकणार आहे. भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना मंगळवारी गुवाहाटी येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. त्याचबरोबर भारत-श्रीलंका वनडे मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. याशिवाय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला होणार आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारत आणि श्रीलंकेचे संघ तिरुअनंतपुरममध्ये आमनेसामने असतील.

हे देखील वाचा-