T20 World Cup 2024 : सध्या आयपीएलची रनधुमाळी सुरु आहे. प्रत्येक क्रिकेट चाहता आयपीएलमध्ये मग्न आहे. आयपीएलच्या थरारानंतर टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरु होणार आहे. यंदाचा विश्वचषक संघ 20 संघामध्ये होणार आहे. विश्वचषकाबाबत वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूने भाकीत केलेय. ब्रायन लारा यानं टी20 विश्वचषकाची फायनल भारतीय संघ खेळणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. त्याशिवाय सूर्यकुमार यादव याने चौथ्या क्रमांकावरऐवजी तिसऱ्या क्रिमांकावर फलंदाजीला यावं, असेही लारा यांनी म्हटलेय. 2022 टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा उपांत्य सामन्यात इंग्लंडने पराभव केला होता. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया फायनल खेळेल, असा अंदाज लारा यांनी व्यक्त केला आहे.
सूर्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी -
ब्रायन लारा यांच्या मते सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजाला उतरलायला हवे. लारा म्हणाले की, सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा माझा सल्ला आहे. सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक आहे. सर रिचर्ड्स यासारक्या खेळाडूंना विचारल्यास मधल्या फळीमध्ये खेळण्यास त्यांचा उत्साह ते सांगतील. मला सूर्यकुमार यादव याच्यामध्येही तोच उत्साह दिसत आहे. सूर्यकुमार यादव जितका खेळपट्टीवर असेल, तितके चांगले असेल. सूर्यकुमार सलामी फलंदाज नाही, त्याने 10-15 षटकं फलंदाजी करायला हवी. सूर्यकुमार यादव कोणत्याही स्थितीमध्ये सामना जिंकून देऊ शकतो.
सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 50 पेक्षा जास्त सरासरीने 1402 धावांचा पाऊस पाडलाय. त्यानं तिसऱ्या क्रमांकावर फक्त 14 डावात फलंदाजी करताना 479 धावांचा पाऊस पाडलाय.
भारत-वेस्ट इंडिज यांच्यामध्ये फायनल -
ब्रायन लारा यांनी टी20 विश्वचषकाबाबतची मोठी भविष्यवाणी केली आहे. ब्रायन लारा यांच्यामध्ये वेस्ट इंडिज आणि भारतामध्ये फायनलाचा सामना होणार आहे. लारा म्हणाले की, "वेस्ट इंडीजने विश्वचषकात चांगली कामगिरी करायला हवी. कारण, वेस्ट इंडिजकडे एकापेक्षा एक स्फोटक फलंदाजांचा समावेश आहे. भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले असतील, पण संघ टॉप 4 मध्ये नक्कीच दाखल आहे. इंग्लंडला वेस्ट इंडिजच्या खेळपट्टीवर खेळण्यास मज्जा येते. इंग्लंडशिवाय अफगाणिस्तानचा संघही टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे. फायनलमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आमनासामना होऊ शकतो. जो संघ सर्वोत्तम खेळेल, तो चषकावर नाव कोरेल. "