Rishabh Pant Weakness : भारत-दक्षिण अफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये आज, पाचवा टी 20 सामना होत आहे. आतापर्यंत झालेल्या चार टी 20 सामन्यात भारतीय कर्णधार ऋषभ पंतला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी नियोजनबद्ध कामगिरी करत करेक्ट कार्यक्रम केलाय. चौथ्या टी 20 सामन्यात ऋषभ पंत बाद झाल्यानंतर केशव महाराज पळत कर्णधाराकडे गेला होता. त्यावरुन दक्षिण आफ्रिका संघाने पंतसाठी खास योजना आखल्याचं समोर आले. केशव महाराजन ऋषभ पंतला वाइड आउटसाइड ऑफ वर चेंडू ठेवला होता, त्यामुळे पंतच्या बॅटची बाहेरील बाजूला लागून थर्ड मॅनवर झेलबाद झाला. पंतला आऊट कऱण्यासाठी नियोजन आखले होते.
पहिल्या आणि दुसऱ्या टी 20 सामन्यातही ऋषभ पंत याच पद्धतीने बाद झाला होता. पहिल्या टी 20 सामन्यात एनरिक नॉर्कियाने तर दुसऱ्या टी 20 सामन्यात केशव महाराजने वाइड आउटसाइड ऑफ वर चेंडू टाकत पंतला तंबूत पाठवले होते. चार सामन्यात तीन वेळा पंत एकाच पद्धतीने बाद झालाय. त्यामुळे ऋषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी गोलंदाजांनी पूर्वनियोजन केले होते, हे स्पष्ट होतेय.
आयपीएलमध्येही ऋषभ पंत याच पद्धतीने बाद झालाय. यंदा झालेल्या 19 टी20 डावात तब्बल 10 वेळा पंत एकाच पद्धतीने बाद झालाय. भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही पंतच्या या कमकुवत बाजूवर बोट ठेवले होते. त्यांनी हे चांगलं संकेत नसल्याचं सांगितले. पंतने आपल्या चुकातून लवकर शिकावं, असे सांगितले होते.
चार सामन्यात पंतची खराब कामगिरी, एकही अर्धशतक नाही
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मायदेशात सुरु असलेल्या टी 20 मालिकेत ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. चार सामन्यात पंतला फक्त 57 धावा करता आल्या. त्याचा स्ट्राईक रेटही 105 इतकाच राहिला. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. पंतचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.