Team India vs South africa 2nd T20I: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दुसरा सामना टीम इंडियानं (Team India) गमावला. दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला (IND vs SA) नमवत सामना खिशात घातला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज फ्लॉप ठरले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं DLS नियम वापरून टीम इंडियाचा पाच विकेट्सनी पराभव केला. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना मंगळवारी (12 डिसेंबर) सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे खेळवण्यात आला. 


टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहनं दोन ओव्हर्समध्ये 31 धावा दिल्या. त्याच्या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. रीझा हेंड्रिक्स आणि मॅथ्यू ब्रिट्झके यांनी डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये अर्शदीपवर हल्ला चढवला. या ओव्हरमध्ये त्यांनी 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. यानंतर आफ्रिकन फलंदाजांनी टीम इंडियाविरुद्ध गिअर टाकला. तर मोहम्मद सिराजनंही पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतही अर्शदीपला फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानं 10.69 च्या इकॉनॉमी रेटनं चार विकेट घेतल्या. आतापर्यंत त्यानं 41 टी-20 सामन्यांमध्ये 8.42 च्या इकॉनॉमीनं एकूण 58 विकेट्स घेतल्या आहेत. 






टीम इंडियाच्या गोलदांजांच्या निराशाजनक खेळीनंतर ट्विटरवर मीम्सचा महापूर पाहायला मिळाला. अर्शदीप सिंह आणि सिराजवर नेटकरी तुटून पडलेत. सोशल मीडियावर एका युजरनं अर्शदीपला रन मशीन असं म्हटलं आहे. 






आणखी एका युजरनं पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अर्शदीप सिंहला झोडपल्यानंतर एक फनी मीम शेअर केलं आहे. 






पहिल्याच ओव्हरमध्ये सिराजनं 14 धावा केल्यात, त्यानंतर अर्शदीपनं 24 धावा केल्या. यावरही नेटकरी तुटून पडले. 


अर्शदीपच्या खेळीवर नेटकरी नाराज होते. नेटकऱ्यांनी ट्विटरवर लिहिलं की, अर्शदीप संघात स्थान देण्यास पात्र नाही. आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत अर्शदीपची निवड झाल्यास त्याला आश्चर्य वाटेल. दुसर्‍या युजरनं लिहिलं की, तो युगांडाच्या संघात येण्याच्या लायकीचा नाही. काही लोक म्हणाले की, आता अर्शदीपला रिप्लेस करण्याची वेळ आली आहे.


टीम इंडियाच्या गोलंदाजांवर तुटून पडले दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज 


दुसऱ्या टी-20 सामन्यात मोहम्मद सिराजनं 3 ओव्हर्समध्ये 27 धावा दिल्या, अर्शदीपनं 2 षटकांत 31 धावा दिल्या, रवींद्र जाडेजानं 2.5 षटकांत 28 धावा दिल्या, मुकेश कुमारनं 3 ओव्हर्समध्ये 34 आणि कुलदीप यादवनं 3 ओव्हर्समध्ये 26 धावा दिल्या. सिराज आणि कुलदीपला प्रत्येकी 1 तर मुकेश कुमारनं 2 विकेट्स चटकावल्या.