IND vs AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ (Team India) बराच पिछाडीवर गेला आहे. पहिल्या डावात 109 धावांवर सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या डावातही (Team India second inning) भारत 163 धावांत (India vs Australia) सर्वबाद झाला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 76 धावांचीच गरज आहे. दरम्यान भारत पराभवाच्या इतक्या जवळ पोहोचण्यामागे खराब फलंदाजी हे एक मोठं कारण असून भारताचे सर्वच स्टार फलंदाज खास कामगिरी करु शकलेले नाहीत. यावेळी युवा फलंदाज श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer)डावात खास कामगिरी करु शकला नाही. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला श्रेयस दुसऱ्या डावात काहीसा लयीत दिसत होता. पण 26 धावांवर त्याला नॅथन लायनच्या गोलंदाजीवर विकेट गमवावी लागली. यावेळी त्याचा झेल टिपला तो ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यानं. उस्माननं घेतलेला हा झेल इतका (Usman Khawaja breathtaking catch) अप्रतिम होता, की नेटकरीही त्याचं कौतुक करत असून या कॅचचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पाहा उस्मान ख्वाजानं टिपलेला अप्रतिम झेल-
ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ
ऑस्ट्रेलियाला (Australia) विजयासाठी केवळ 76 धावा करण्याची गरज आहेत. नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजी निवडल्यावर पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारतानं 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत दुसऱ्या डावातही 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. एकीकडे पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारताचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतत होते. पण त्याचवेळी टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) याने 142 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत 59 धावा केल्या. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान 163 इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून आता तिसऱ्या दिवशी 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार आहे.
हे देखील वाचा-