World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या ऐतिहासिक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. मात्र, वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल 2023 मध्ये काही खेळाडूंनी कोड ऑफ इंडक्टचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. 


'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार, 4 भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये 'आचारसंहिते'चं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी बीसीसीआयकडे तक्रार करण्यात आली आहे. चार खेळाडूंनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल बीसीसीआयकडे तक्रार करण्यात आली आहे. ज्या खेळाडूंची बीसीसीआयकडे तक्रार करण्यात आली आहे, त्यापैकी काही खेळाडू टीम इंडियाच्या टी-20 संघाचा भाग आहेत, तर काही टी-20 संघात निवडीचे दावेदार आहेत. त्यामुळे या खेळाडूंवर कारवाई झाली, तर वर्ल्डकप आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या टी-20 संघातून मात्र या खेळाडूंना बाहेर बसावं लागणार आहे. .


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये खेळलेल्या संघांमधील किमान चार खेळाडूंची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) तक्रार केली आहे. तसेच, बीसीसीआयनंही याकडे लक्ष दिलं गेलं नसल्याचं मान्य केलं आहे. 


वेस्ट आणि नॉर्थ झोनचे आहेत हे खेळाडू; अशी झाली पोलखोल 


ज्या खेळाडूंनी आचारसंहितेचा भंग केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ते सर्व देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर आणि पश्चिम विभागाकडून खेळतात. तसेच, उत्तर विभागातील एका फ्रँचायझीच्या मालकानं काही प्रसंगी या खेळाडूंच्या वर्तनाबद्दल तक्रार केली होती. ज्यानुसार काही खेळाडूंनी आयपीएल खेळाडूंसाठी घालून दिलेल्या नियमांचं अनेकदा उल्लंघन केलं. या प्रकरणाची तक्रार बीसीसीआयकडेही करण्यात आली होती.


आयपीएलमध्ये नियम मोडले, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये विक्रम रचले


दोन खेळाडू जे नॉर्थ झोन फ्रँचायझीशी संबंधित आहेत. या दोन्ही युवा खेळाडूंचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बोलबाला आहे. मात्र, त्यांच्याबाबत तक्रार आली असली तरिही अद्याप बीसीसीआयकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. संघ मालकानं क्रिकबझला सांगितलं की, "जेव्हा मला परिस्थितीची माहिती मिळाली, तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो आणि लगेचच बीसीसीआयला ही बाब कळवली. इंटीग्रिटी ऑफिसर्सनही या उल्लंघनाची गंभीर दखल घेतली. फ्रँचायझी स्तरावर या खेळाडूंविरुद्ध योग्य ती पावलं उचलण्यात आली होती, असंही ते म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालं तरीही पाकिस्तानचा ख्वाडा, आयसीसीला आशा कायम