PAK vs ENG: बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर कसोटी खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालाय. पाकिस्तान दौऱ्यात इंग्लंडचा संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. येत्या 1 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी बेन स्टोक्सनं ट्विटरद्वारे पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना मदत जाहीर करण्याची घोषणा केलीय. ज्यानंतर पाकिस्तान नव्हे तर संपूर्ण जगभरातून बेन स्टोक्सच्या निर्णयाचं कौतूक केलं जातंय. 

पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी बेन स्टोक्सनं एक ट्वीट केलंय. पाकिस्तान दौऱ्यात त्याला मिळणारी मॅच फी तो पाकिस्तानमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याची घोषणा केलीय. बेन स्टोक्सनं आपल्या ट्वीटमध्ये असं लिहलंय की, "पहिल्यांदा ऐतिहासिक कसोटी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये आलोय. तब्बल 17 वर्षानंतर कसोटी संघ म्हणून या ठिकाणी येणं, खूप उत्साहित करणारं आहे. तसेच एखाद्या संघाचं नेतृत्व करणं एक मोठी जबाबदारी  आहे. "

ट्वीट-

 

क्रिकेटनं मला आयुष्यात खूप काही दिलंय
"पाकिस्तानमध्ये आलेला पूर आणि त्यामुळं झालेला विध्वंस पाहणे वेदनादायक आहे, ज्याचा देश आणि तेथील लोकांवर मोठा परिणाम पाहायला मिळाला. क्रिकेटनं मला आयुष्यात खूप काही दिलंय.मी पाकिस्तान दौऱ्यातीलमॅच फी मी पूरग्रस्तांना देईन. या मदतीमुळं पाकिस्तानातील बाधित लोकांना पुन्हा उभे राहण्यास मदत होईल अशी आशा आहे", असं बेन स्टोक्सनं म्हटलंय. 

तब्बल 17 वर्षानंतर इंग्लंड पाकिस्तान दौऱ्यावर
इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर होती. त्यावेळी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सात सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. या मालिकेत इंग्लंडच्या संघानं 4-3 नं मालिका जिंकली. कसोटी मालिकेबाबत बोलायचं झालं तर इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानशी कसोटी मालिका खेळणार आहे. 

पाकिस्तान- इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख
पहिला कसोटी सामना 01 डिसेंबर 2022- 05 डिसेंबर 2022
दुसरा कसोटी सामना 09 डिसेंबर 2022- 13 डिसेंबर 2022
तिसरा कसोटी सामना 17 डिसेंबर 2022- 21 डिसेंबर 2022

हे देखील वाचा-