AUS vs IND 2nd Test Beau Webster Australias squad : बॉर्डर-गावसकर मालिका 2024-25 चा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मोठा विक्रम केला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम केला. त्याचबरोबर या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळेच ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शला संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. मार्शच्या जागी ऑस्ट्रेलियन संघाने शेफिल्ड शिल्डमध्ये तस्मानियाकडून खेळणाऱ्या ब्यू वेबस्टरचा भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश केला आहे.
30 वर्षीय अष्टपैलू खेळाडू संघात झाला सामील
भारत 'अ' विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसह रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या अलीकडील चांगल्या कामगिरीमुळे वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला. भारत अ विरुद्धच्या अनधिकृत 'कसोटी' मालिकेत वेबस्टर हा ऑस्ट्रेलिया अ साठी 72.50 च्या सरासरीने 145 धावा करणारा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 20 पेक्षा कमी सरासरीने सात विकेट्सही घेतल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ही डे-नाईट टेस्ट असेल जी पिंक बॉलने खेळली जाईल. या सामन्यासह ऑस्ट्रेलियाला मालिकेत पुनरागमन करायचे आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाची गोलंदाजी आणि फलंदाज दोन्ही मजबूत व्हाव्यात यासाठी संघाने ब्यू वेबस्टरसारख्या खेळाडूचा आपल्या संघात समावेश केला आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पुढीलप्रमाणे :
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, नॅथन मॅकस्विनी. , स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ :
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी.
हे ही वाचा -