BCCI Election Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यामान सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आता जय शाह (ICC) यांच्या जागी बीसीसीआयच्या (BCCI) सचिवपदावर कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा रंगली आहे. आयसीसीचे पद स्वीकारण्यासाठी जय शाह यांना बीसीसीआयचे पद सोडावे लागणार आहे. बीसीसीआयच्या सचिवपदासाठी 29 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार 1 डिसेंबरपासून सांभाळणार आहेत. 

सचिवपदासाठी आघाडीवर कोण?

जय शाह (Jay Shah) यांच्यानंतर अनेकजण बीसीसीआय सचिवपदाच्या शर्यतीत आहे. त्यापैकी पहिले नाव आहे दिल्ली जिल्हा आणि क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली. मात्र, याबाबत रोहन जेटली यांना विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. याशिवाय आयपीएलचे विद्यमान अध्यक्ष अरुण धुमाळ हेही सचिवपदाच्या शर्यतीत आहेत. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार हेही सचिवपदाच्या शर्यतीत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

जय शाह यांची बिनविरोध निवड-

नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ग्रेग बार्कले 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर राहण्यास नकार दिला होता, त्यानंतर जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत. 

आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय-

नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ग्रेग बार्कले 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर राहण्यास नकार दिला होता, त्यानंतर जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत. 

आतापर्यंत 4 भारतीयांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले-

आतापर्यंत 4 भारतीयांनी आयसीसी प्रमुखपद भूषवले आहे. जगमोहन दालमिया 1997 ते 2000 पर्यंत आयसीसीचे अध्यक्ष होते. शरद पवार 2010 ते 2012 पर्यंत ICC चे अध्यक्ष होते. एन श्रीनिवासन हे 2014 ते 2015 मध्ये आणि शशांक मनोहर 2015-2020 मध्ये ICC चे अध्यक्ष होते. 2015 पूर्वी आयसीसी प्रमुखांना चीफ प्रेसिडेंट म्हटले जायचे. यानंतर त्यांना अध्यक्ष म्हणून संबोधले जाऊ लागले.

संबंधित बातमी:

आयपीएलच्या मेगा लिलावात रोहित शर्मावर 50 कोटींची बोली लावणार?; लखनौच्या मालकांनी सगळं सांगितलं!