Shakib Al Hasan On Tamim Iqbal : बांगलादेश क्रिकेटमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दोन दिग्गज खेळाडूंमधील वाद आता संपूर्ण क्रीडा विश्वासमोर आला आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन आणि सिनिअर खेळाडू तमीम इक्बाल यांच्यामधील वादाने बांगलादेशच्या क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. विश्वचषकाच्या संघात तमीम इक्बाल याला बांगलादेशच्या संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली.
अनुभवी तमीम इक्बाल याला विश्वचषकासाठी संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर तमीम इक्बाल याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि शाकीब अल हसन यांच्यावर गंभीर आरोप केले. आता शाकीब अल हसन याने तमीमला उत्तर दिलेय. शाकीब हल हसन याने तमीम इक्बाल याला बालिश असे म्हटलेय. त्याशिवाय तमीम स्वत:ला संघापेक्षा मोठा समजत असल्याचेही शाकीबने सांगितले.
तमीम इक्बाल याने काय म्हटले होते ?
वर्ल्ड कपच्या संघात स्थान न मिळाल्यामुळे तमीम याने फेसबूक पोस्ट करत बांगलादेश क्रिकेट आणि शाकीब अल हसन यांच्यावर गंभीर आरोप केले. बांगलादेश क्रिकेट बोर्ड गंभीर राजकारण करत आहे. मला फिटनेसमुळे संघात वगळल्याचे बांगलादेश क्रिकेट बोर्ड खोटं सांगत आहे. मी पूर्णपणे फिट आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाला वैतागलो आहे. आता शाकीब अल हसन याने एका सामन्यासाठी खूप सारी तयारी करावी लागते, असे म्हटलेय, प्लॅनसह काम करावे लागते, असे तो म्हणाला.
शाकीब अल हसन याने दिले रोहित शर्माचे उदाहरण...
तमीम इक्बाल याला उत्तर देताना शाकीब अहल हसन याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचे उदाहरण दिले. त्याशिवाय तमीम इक्बाल याला बाालिश असल्याचेही म्हटलेय. तमीम इक्बाल स्वत:ला संघापेक्षा मोठा मानत आहे, असेही शाकीब म्हणाला. तमीम इक्बाल याला उत्तर देताना शाकीबने रोहित शर्माचे उदाहरण दिले. शाकीब म्हणाला की, तमीम इक्बाल याला फलंदाजीबाबत कुणी विचारले, तर त्यात चुकीचे काही नाही. कोणत्याही खेळाडूपेक्षा संघ नेहमीच मोठा असतो. रोहित शर्माने सुरुवातीला सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. पण आता तो सलामीला शानदार खेळत आहे. तुम्हाला संघ जो रोल देईल, तिथेच खेळावे लागेल. स्वत:पेक्षा नेहमीच संघाला प्राधान्य द्यायला हवे.
आशिया चषकासाठी बांगलादेशचा संघ :
शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तंजिद तमीम, नजमुल हुसैन शंटो, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसैन, अफीफ हुसैन , शोरफुल इस्लाम, एबादोत हुसैन, मोहम्मद नईम
आणखी वाचा :
World Cup 2023 : वर्ल्डकपआधीच कांगारुंना मोठा धक्का, मॅचविनर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर
𝗠𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽 𝗕𝗲𝗴𝗶𝗻𝘀.... सराव सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, भारताचा सामना कधी ?
मालिका जिंकल्यानंतर रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही, हिटमॅनने असे का केलं? कारण..