World Cup 2023 Warm-up Matches Schedule : क्रिकेटमधील महाकुंभाला अवघे आठ दिवस शिल्लक राहिलेत. विश्वचषकाच्या (World cup 2023) रनसंग्रामात सहभागी होणारे सर्व संघ भारतात (india) दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंडसह सर्व संघ भारतात दाखल झाले आहेत. विश्वचषकाआधी सर्व संघांचे प्रत्येकी दोन दोन सराव सामने (Warm-up Matches) होणार आहेत. सराव सामन्याला 29 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) काही दिवसांपूर्वी सराव सामन्याचे वेळापत्रक जारी केले होते.  बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटी येथे पहिला सराव सामना होणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सराव सामना 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. भारताचा दुसरा सराव सामना नेदरलँडविरोधात 3 ऑक्टोबर रोजी होईल. 

पहिल्या दिवशी, 29 सप्टेंबर रोजी तीन वॉर्मअप सामने होणार आहेत. त्यामध्ये श्रीलंका-बांगलादेश यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिका आणि आफगाणिस्तान आणि न्यूझीलंड-पाकिस्तान या सामन्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका आणि आफगाणिस्तान यांच्यातील सामना तिरूवनंतपुरम येथे होणार आहे. तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना हैदराबाद येथे होणार आहे.  न्यूझीलंड आपला पहिला वॉर्मअप सामना गुवाहटी येथे खेळेल. अखेरचा सराव सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तीन ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणार आहे. त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. 

सराव सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक - 

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (29 सप्टेंबर)दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगानिस्तान- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (29 सप्टेंबर)न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान- राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (29 सप्टेंबर)भारत विरुद्ध इंग्लंड- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (30 सप्टेंबर)ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (30 सप्टेंबर)इंग्लंड विरुद्ध बांगलादेश- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (2 अक्टूबर)न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (2 अक्टूबर)अफगानिस्तान विरुद्ध श्रीलंका- बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (3 अक्टूबर)भारत विरुद्ध नेदरलँड- ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम (3 अक्टूबर)पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया- राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (3 अक्टूबर).

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ  - 

5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.