Rohit Sharma & KL Rahul Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याची मालिका पार पडली. राजकोट येथे झालेल्या सामन्यात भारताचा 66 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने व्हाइट वॉश टाळला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली. मालिका विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने पुरस्कार सोहळ्यात ट्रॉफीला हातही लावला नाही. चषक घेण्याची वेळ आली तेव्हा रोहित शर्माने केएल राहुल याला पुढे केले. रोहित शर्माच्या निर्णाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल -


भारताने मालिकेतील पहिले दोन सामने राहुलच्या नेतृत्वात जिंकले होते. रोहित शर्मा अखेरच्या सामन्यात कर्णधार होता. त्यामुळे ज्यावेळी पुरस्कार सोहळ्यात चषक देण्यासाठी भारतीय कर्णधाराला बोलवण्यात आले, त्यावेळी रोहित शर्माने राहुलला पुढे केले. तो फ्रेममध्येही गेला नाही. पण निरंजन शाह यांनी रोहित शर्माला बोलवले. त्यानंतर रोहित शर्मा पोहचला, मात्र चषकापासून दूरच होता. रोहित शर्माने चषकाकडे फक्त अंगठा दाखवत फक्त इशारा केला. चषक उंचावल्यानंतर केएल राहुल याने रोहित शर्माला मिठी मारत शुभेच्छा दिल्या.


रोहित शर्माचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. अनेकांना रोहित शर्माचा हा स्वभाव खूप आवडला. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 



 पाहा व्हिडीओ - 











पहिल्या दोन सामन्यात राहुल भारताचा कर्णधार - 


विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापकाने रोहित शर्मा, विराट कोहली या सिनिअर खेळाडूंना आराम दिला होता. सिनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत केएल राहुल याच्याकडे नेतृत्व दिले होते. मोहाली येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने पाच विकेटने बाजी ममारली होती. त्यानंतर इंदूर येथे झालेल्या सामन्यात भारताने 99 धावांनी विजय मिळवला होता. पण अखेरच्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पण भारताने तीन सामन्याच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. अखेरच्या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे होते.


आणखी वाचा :


𝗠𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽 𝗕𝗲𝗴𝗶𝗻𝘀.... सराव सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, भारताचा सामना कधी ?