Babar Azam in T2O WC : ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा पराभव करत टी-20 विश्वचषकावर नाव कोरलेय. स्पर्धा संपल्यानंतर आयसीसीनं टी-20 विश्वचषकातील सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली आहे. साखळी फेरीत प्रभावी कामगिरी न करणाऱ्या भारतीय संघातील एकाही खेळाडूची या अंतिम 11 खेळाडूमध्ये निवड करण्यात आलेली नाही. राहुल, रोहित, विराट आणि बुमराहसारख्या दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेल्या संघातील एकाही खेळाडूला अंतिम 11 मध्ये स्थान मिळालेलं नाही. स्पर्धेत लौकिकास साजेशी कामगिरी न करता आल्यामुळे भारतीयांचा संघात समावेश झालेला नाही.
आयसीसीनं आपल्या टी-20 संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे बाबर आझमकडे सोपवली आहेत. बाबरशिवाय 11 मध्ये एकाही पाकिस्तानी खेळाडूला स्थान मिळवता आलेलं नाही. शाहीन आफ्रिदीला 12 वा खेळाडू म्हणून निवडलं आहे. बाबरकडे कर्णधारपद सोपवलं असून तिसऱ्या क्रमांकावर त्याची निवड करण्यात आली आहे. जॉस बटलर आणि डेव्हिड वॉर्नर यांना सलामीची जोडी म्हणून निवडण्यात आलं आहे. या संघात श्रीलंकेच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या तीन, न्यूझीलंडच्या एक, इंग्लंडच्या दोन, दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारत, बांगलादेश, वेस्ट विडिंज आणि अफगाणिस्तान संघातील एकाही खेळाडूला अंतिम 11 खेळाडूमध्ये स्थान मिळवता आलेलं नाहीय
आयसीसीनं निवडलेला संघ – (फलंदाजीच्या क्रमवारीनुसार)
1. डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 289 रन, 48.16 सरासरी
2. जॉस बटलर (विकेटकीपर, इंग्लंड)- 269 रन, 89.66 सरासरी
3. बाबर आजम, कर्णधार (पाकिस्तान)- 303 रन, 60.60 सरासरी
4. चरिथ असालंका (श्रीलंका)- 231 रन, 46.20 सरासरी
5. एडन मर्करम (दक्षिण अफ्रीका)- 162 रन, 54.00 सरासरी
6. मोईन अली (इंग्लंड)- 92 रन, 7 विकेट
7. वी. हसारंगा (श्रीलंका)- 16 विकेट, 9.75 सरासरी
8. एडम जम्पा (ऑस्ट्रेलिया)- 13 विकेट, 12.07 सरासरी
9. जोश हेजलवुड (ऑस्ट्रेलिया)- 11 विकेट, 15.90 सरासरी
10. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड)- 13 विकेट, 13.30 सरासरी
11. एनरिक नॉर्किया (दक्षिण अफ्रीका)- 9 विकेट, 11.55 सरासरी
12वा खेळाडू - शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)- 7 विकेट, 24.14 सरासरी