IND vs NZ: आयसीसी टी-20 विश्वचषक 2021ची कालच सांगता झाली. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकलाय. या विश्वचषकात भारताची कामगिरी निराशाजनक होती. विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. मात्र, या सर्व गोष्टी मागे टाकून भारतीय संघ न्यूझीलंडशी (India Vs New Zealand) 3 टी-20 आणि कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी न्यूझीलंडचा संघ यूएईतून भारतात दाखल झालाय. दरम्यान, टी-20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्मा संभळणार आहे. तर, केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. 

या मालिकेपासूनच राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकांपूर्वी द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघानं सरावाला सुरुवात केलीय. दरम्यान, राहुल द्रविडनं मैदानात भारतीय खेळाडूंशी संवाद दिसला. तसेच युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतानाही दिसला. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना 17 नोव्हेंबर खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 19 नोव्हेंबरला आणि तिसरा टी- 20 सामना 21 नोव्हेंबरला खेळवला जाईल. हे सर्व सामने जयपूरमध्ये खेळले जाणार आहे. 

भारतानं टी-20 विश्वचषकातील 18 वर्षांच्या इतिहासात न्‍यूझीलंडविरोधातील एकही सामना जिंकलेला नाही. टी-20  विश्वचषकात न्‍यूझीलंडविरोधात भारताची कामगिरी खूपच खराब आहे. भारताला 2003 पासून न्‍यूझीलंडविरोधात एकही विजय मिळवता आला नाही. न्यूझीलंड विरुद्ध आगामी टी-20 मालिकेत भारत चांगली कामगिरी बजावेल, अशी अपेक्षा केली जाते.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

Hardik Pandya: हार्दिक पांड्याची 5 कोटी किमतींची 2 घड्याळं कस्टमच्या ताब्यात 

बुटात बियर टाकून पिणे, ऑस्ट्रेलियाच्या किळसवाणं वाटणाऱ्या सेलिब्रेशनमागील खरी कहाणी

IND vs NZ : हनुमा विहारीला संघात स्थान का मिळालं नाही ? सुनील गावसकरांनी सांगितलं IPL चं  कारण