Axar Patel and Meha Patel : टीम इंडियाचा स्टार खेळाडू अक्षर पटेल (Axar Patel) आज मेहा पटेलसोबत (Meha Patel) लग्न करणार आहे. लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. काल रात्री संगीताचा कार्यक्रमही पार पडला.  ज्यामध्ये क्रिकेटपटू जोरदार नाचताना दिसले. त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अक्षर आणि मेहाची जोडी खूपच सुंदर दिसत असून मेहाचा खास लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


व्हिडिओमध्ये अक्षर पटेल आणि मेहा खूप आनंदी दिसत आहेत आणि जोरदार नाचत आहेत. हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम यूजरने शेअर केला आहे. मेहा लाल रंगाच्या घागरा-चोळी या गुजराती पारंपरिक पोशाखात दिसत आहे, तर अक्षर पटेलने कुर्ता पायजामा घातला आहे. अक्षर आणि मेहाची जोडी अगदी क्यूट दिसत असल्याचं नेटकरी कमेंट्समधून सांगत आहेत.


20 जानेवारी 2022 रोजी झाला साखरपुडा


मागील वर्षी 20 जानेवारी 2022 रोजी अक्षर पटेलने मेहा पटेलशी एंगजमेंट केली होती. आता समोर येणाऱ्या माहितीतून दोघेही आज म्हणजेच 26 जानेवारीला लग्न करणार आहेत. अक्षरने अद्याप या सर्वाची जाहीर घोषणा केलेली नाही. मेहा आणि अक्षर पटेल एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात आणि मेहाच्या सोशल मीडिया हँडलवर अक्षरसोबत अनेक फोटोज आहेत. मेहा आणि अक्षर एकमेकांवर खूप प्रेम करत असल्याचं फोटोजमधून दिसून येतं. समोर येणाऱ्या माहितीनुसार, लग्नाचे सर्व विधी चार दिवस चालणार आहेत. या लग्नाला अनेक क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.






कोण आहे मेहा पटेल? (Meha Patel)


भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा मेहा पटेलसोबत (Meha Patel) विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान जवळपास सर्वच क्रिकेट चाहत्यांना केएल राहुलची पत्नी आथियाबाबत माहिती होती. परंतु, अक्षर पटेलच्या भावी पत्नीला कदाचित फारसे लोक ओळखत नसावे. त्यामुळे अक्षरची भावी पत्नी मेहाबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. अक्षर पटेलची भावी पत्नी मेहा पटेल ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. मेहा पटेलने यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अक्षर पटेलसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. मेहा पटेलने या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय ती डाएटशी संबंधित माहिती देखील शेअर करत असते.


हे देखील वाचा-