8 Sixes in an Over: जगभरातील लोकप्रिय खेळात क्रिकेटचा समावेश केला जातो. क्रिकेटमध्ये नेहमी नवनवीन विक्रम पाहायला मिळतात. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने रचलेला विक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम हॅरिसनने (Sam Harrison) एका षटकात चक्क 8 षटकार ठोकले आहेत. हे ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका षटकात केवळ सहा चेंडू फेकले जात असताना या खेळाडूने 8 षटकार कसे मारले? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांसह अनेकांना पडला आहे. तर, या खेळाडूने एका षटकात 8 षटकार कसे मारले? याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
ऑस्टेलियाच्या घरेलू क्रिकेटदरम्यान सोरेन्टो डंक्रेग सिनिअर क्लब आणि किंग्सले-वुडवले क्लब यांच्यात सामना पार पडला. दरम्यान, सोरेन्टो डंक्रेग सिनिअर क्बलकडून खेळताना सॅम हॅरिसनने विक्रमी खेळी केली आहे. त्याने एका ओव्हरमध्ये चक्क 8 षटकार ठोकून इतिहास रचला आहे. या सामन्याच्या 39 व्या षटकात किंग्सले-वुडगले क्लबकडून गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या नॅथन बेनेटने एका षटकात 8 चेंडू टाकले. यात दोन नो-बॉलचा समावेश आहे. याच षटकात सॅम हॅरिसनने तुफानी खेळी करीत 8 चेंडूवर 8 षटकार ठोकले.
एका षटकात 77 धावांचा विक्रम-
एखाद्या गोलंदाजाने एका षटकात 36 पेक्षा जास्त धावा देण्याची ही पहिली वेळ नाही. न्यूझीलंडमध्ये प्रथम श्रेणी सामन्यात बर्ट व्हान्सने एका षटकात 77 धावा दिल्या होत्या. आतापर्यंत एका षटकात दिलेल्या सर्वाधिक धावांचा हा विक्रम आहे.
एकाच षटकात 6 षटकार ठोकलेले फलंदाज-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 3 खेळाडूंनी एका षटकात 6 षटकार मारले आहेत. दरम्यान, भारताचा युवा फलंदाज युवराज सिंहने टी -20 विश्वचषक 2007 मध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्सनेही 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. त्याने 2007 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. याशिवाय वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डने श्रीलंकेविरुद्ध 6 षटकार ठोकले आहेत.
संबंधित बातम्या-
Ind vs Pak: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोहली चिंताग्रस्त? विराटने दिलं उत्तर
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार? रोहित शर्मा म्हणाला...