Australia Squad for ODI Series: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी (IND vs AUS ODI) ऑस्ट्रेलियन संघाची (Team Austrelia) घोषणा करण्यात आली आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्शसारखे स्टार खेळाडू संघात परतले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या वनडे संघाची कमानही पॅट कमिन्सकडे देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श दुखापतीतून सावरले आहेत. गेल्या आठवड्यात हे दोन्ही खेळाडू देशांतर्गत स्पर्धेत खेळताना दिसले होते. या दोन दिग्गजांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियन संघाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघात समाविष्ट केलेले बहुतांश खेळाडू सध्या भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेचा भाग आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 16 सदस्यीय वनडे संघातील 9 खेळाडू सध्या भारतात आहेत. दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडलेल्या डेव्हिड वॉर्नरचाही ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांची मालिका
ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिंस (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स केरी, कॅमरन ग्रीन, ट्रेविस हेड, जोश इंगलिस, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईत होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्चला विशाखापट्टणम आणि तिसरा सामना 22 मार्चला चेन्नईत खेळवला जाईल. तिनही सामने दिवस-रात्रीचे म्हणजेच, दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :