AUS vs PAK, Boxing Day : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाच्या फिल्डिंगची चर्चा होते. पाकिस्तानच्या खेळाडूंनी अनेक सोपे झेल तर सोडलेच.. पण त्यांनी फिल्डिंगही अतिशय खराब केली. एकाच चेंडूवर पाच धावा दिल्या. वाईड, चौकार आणि नो बॉल नसतानाही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एकाच चेंडूवर पाच धावा पळून काढल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पाकिस्तानच्या फिल्डिंगवर अनेकांनी सवाल उपस्थित केलाय. त्याशिवाय असा विक्रम फक्त पाकिस्तानच करु शकतो, अशी खोचक टिपण्णीही अनेकांनी दिली. 


बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाच्या फिल्डिंगची जोरदार चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या फिल्डर्सनी झेल सोडले, एकेरी दुहेरी धावसंख्या दिल्या. यामध्ये पाकिस्तानमधील चाहत्यांनाही त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत होता. पॅट कमिन्स आणि अॅलेक्स कॅरी फलंदाजी करत होते. पॅट कमिन्स याने दोन धावेसाठी चेंडू मारला. कमिन्स अन् कॅरी यांनी दोन धावा पळून काढल्याही.. पण पाकिस्तानच्या फिल्डरने चुकीचा थ्रो टाकला. बॅकअपला कुणीही नव्हते.. चेंडू सीमारेषाकडे गेला. त्याच्यामागे पाकिस्तानचा फिल्डर धावला.. पण तोपर्यंत कमिन्स अन् कॅरी यांनी पाच धावा पळून काढल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाकिस्तानच्या फिल्डिंगची खिल्ली उडवली जातेय. 


पाहा व्हिडीओ...







मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 317 धावांचे लक्ष्य दिले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 262 धावा केल्या. पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात अश्वासक सुरुवात केली आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत तीन बाद 129 धावा केल्या आहेत. अब्दुलाह शफीक आणि इममाम उल हक स्वस्तात माघारी परतले. शफीकने चार तर इमामने 12 धावा केल्या. पण त्यानंतर आजी-माजी कर्णधाराने पाकिस्तानचा डाव सावरला. कर्णधार शान मसूद याने 60 धावांची खेळी केली. यामध्ये आठ चौकार लगावले. सध्या बाबर आझम आमि सौद शकील खेळत आहेत. बाबर आझम 35 धावांवर फलंदाजी करत आहे. 


दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 262 धावांत संपुष्टात आला. मिचेल मार्श याने शानदार फलंदाजी केली. त्याने 96 धावा जोडल्या. अॅलेक्स कॅरी आणि स्मिथ यांनीही अर्धशतके ठोकली. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदी आणि मीर हम्जा यांनी भेदक मारा केला. दोघांनाही प्रत्येकी चार चार विकेट घेतल्या.