Australia vs India 2nd Test : पर्थमधील पहिली कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडिया ॲडलेड कसोटीत बॅकफूटवर दिसत आहे. ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ 180 धावांत गडगडला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 337 धावांवर आटोपला असून ऑस्ट्रेलियाने 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने 140 धावांची शानदार शतकी खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले. 


ॲडलेड कसोटीत टीम इंडियात पुनरागमन करणारा कर्णधार रोहित शर्माने 2 दिवसातच अशा चुका केल्या, ज्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, तो ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला. यानंतर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने आणखी एक चूक केली, ज्यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले.


नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करणे ही रोहित शर्माची पहिली चूक होती, तीही अशा खेळपट्टीवर जिथे प्रथम गोलंदाजी करणे फायदेशीर आहे. यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने आणखी एक चूक केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला फक्त चार षटके टाकली. 


तरी त्याने त्याचे काम चोख बजावले. त्याने सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर नॅथन मॅकस्विनीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर स्टीव्ह स्मिथची विकेट घेतली. पण जर रोहितने बुमराहचा स्पेल चालू ठेवला असता तर भारताला आणखी विकेट मिळू शकल्या असत्या त्यामुळे टीम इंडियावर कांगारू संघाची आघाडी जास्त झाली नसती. यानंतर बुमराहला दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. दुसऱ्या सत्रात बुमराहने कर्णधार पॅट कमिन्सची विकेट घेतली.


रोहित शर्मा बॅटिंगमध्ये ठरला अपयशी 


प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला ॲडलेड कसोटीत 200 धावाही करता आल्या नाहीत. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली. मात्र डावाच्या पहिल्याच चेंडूवर जैस्वाल स्टार्कचा बळी ठरला. या सामन्यात एकूण 6 बळी घेत स्टार्कने भारतीय संघाचे कंबरडे मोडले. वर्षानुवर्षे ओपनिंग करणारा 2193 दिवसांनंतर हिटमॅन सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. पण तो काही खास करू शकला नाही. रोहित शर्मा तीन धावा करून बाद झाला.  नितीश कुमार रेड्डी यांनी आपली दुसरी कसोटी खेळताना भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. रेड्डीने 54 चेंडूत 42 धावांची आक्रमक खेळी खेळली आणि संघाची धावसंख्या 180 धावांपर्यंत पोहोचवली.


हे ही वाचा -


Mohammed Siraj on Travis Head : चल निकल.... DPS सिराजने ट्रॅव्हिस हेडचा केला चोख बंदोबस्त! दोघांमध्ये जोरदार बाचाबाची; पहा व्हिडिओ


Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक