Travis Head Century In Adelaide Day-Night Test : पर्थ कसोटीतील विजयानंतर ॲडलेडमध्ये डे-नाईट कसोटी खेळण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खुपच खराब झाली. पिंक बॉलसमोर भारतीय फलंदाज तर अपयशी ठरले पण भारतीय गोलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. यादरम्यान, टीम इंडियासाठी ट्रॅव्हिस हेड नावाची डोकेदुखी दूर होत नाहीये.
गेल्या दीड वर्षात भारताविरुद्धच्या अनेक मोठ्या सामन्यांमध्ये अप्रतिम खेळी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने पुन्हा आपली जादू दाखवली. ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने स्फोटक फलंदाजी करत भारताविरुद्ध आणखी एक शतक झळकावले.
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागातट्रॅव्हिस हेडला टीम इंडियाचीही साथ लाभली, ज्याने शतकापूर्वी 7 चेंडूत झेल घेण्याच्या दोन संधी गमावल्या. हेडला आऊट करण्याची संधी टीम इंडियाला मिळाली होती. 68व्या षटकातील चौथ्या चेंडूवर हेडने लाँग ऑनवर शॉट खेळला. जो खूप उंच गेला होता, पण सिराजने कॅच सोडला. त्यावेळी हेड 76 धावांवर खेळत होता.
त्यानंतर पुढच्याच षटकात हर्षित राणाच्या चेंडूवर हेडने कट शॉट खेळला आणि तो बॅटच्या काठाला लागला पण चेंडू यष्टीरक्षक आणि दुसऱ्या स्लिपमधून गेला. पहिल्या स्लिप पोझिशनवर हा झेल होता पण तिथे एकही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू 4 धावांवर गेला. पंतने झेल घेण्याचा प्रयत्नही केला नाही आणि हीच चूक टीम इंडियाला महागात पडली, त्यानंतर हेड आक्रमक खेळत आपले शतक पूर्ण केले.
घरच्या मैदानावर तिसरे शतक
दुसऱ्या सत्रात ट्रॅव्हिस हेडने तुफानी फलंदाजी करत अवघ्या 111 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण करताना त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले होते. ट्रॅव्हिस हेडच्या कारकिर्दीतील हे 8 वे आणि भारताविरुद्धचे एकूण दुसरे कसोटी शतक आहे. याआधी गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही त्याने भारताविरुद्ध शतक झळकावले होते. घरच्या मैदानावर त्याचे हे तिसरे शतक आहे आणि ते अधिक खास आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो काही दिवसांपूर्वीच बाप झाला होता. दुसरे म्हणजे, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे शतक पाहण्यासाठी 50 हजारांहून अधिक प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते.
हे ही वाचा -