Mohammed Siraj on Travis Head : ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. याचे कारण म्हणजे ट्रॅव्हिस हेड. हेडने जबरदस्त शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 300 च्या पुढे नेली, त्यामुळे कांगारू संघ मोठ्या आघाडीकडे वाटचाल करत आहे. हेडने शानदार फलंदाजी करत 141 चेंडूत 140 धावांची खेळी केली. त्याची विकेट मोहम्मद सिराजने घेतली. मात्र, सिराजने त्याला बाद केल्याने दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि वातावरण चांगलेच तापले.
DSP सिराजने ट्रॅव्हिस हेडचा केला चोख बंदोबस्त
सिराजने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. हेडला सिराजचा यॉर्कर समजू शकला नाही आणि आऊट झाला. त्याने 141 चेंडूत 17 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 140 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. विकेट पडल्यानंतर सिराज आणि हेड यांच्यात बाचाबाची झाली. ज्याचा व्हिडिओ आता सोशल माडियावर व्हायरल होत आहे. विकेट घेतल्यानंतर सिराज ट्रॅव्हिस हेडला चल निघ बोला... यावर हेड पण कायतरी बोलून तेथून निघून गेला.
ट्रॅव्हिस हेडने 140 धावांची स्फोटक खेळी करत सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत केली. ॲडलेड कसोटीत टीम इंडिया बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे. 80 षटकांनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नवीन चेंडू घेण्याचा निर्णय घेतला आणि मोहम्मद सिराजने 82 व्या षटकात ट्रॅव्हिस हेडला क्लीन बॉलिंग करून भारतीय चाहत्यांना दिलासा दिला.
ट्रॅव्हिस हेडला आऊट केल्यानंतर सिराज खूपच संतापलेला दिसत होता. त्याच्या डोळ्यात आग स्पष्ट दिसत होती. तो ऑस्ट्रेलियन फलंदाजाला काहीतरी म्हणाला, ट्रॅव्हिस हेडही शतक झळकावून बाद झाला होता, त्यामुळे त्यानेही सिराजला प्रत्युत्तर दिले. या घटनेनंतर ॲडलेड ओव्हलवर उपस्थित असलेल्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी आवाज काढण्यास सुरुवात केली.
टीम इंडिया 180 धावांवर गडगडली
ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल स्टार्कसमोर भारतीय फलंदाज हतबल दिसत होते आणि संपूर्ण संघ 180 धावांवर गडगडला. स्टार्कने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या होत्या. भारताकडून अष्टपैलू नितीश रेड्डी याने सर्वाधिक 42 धावा केल्या.
हे ही वाचा -