AUS vs ENG 2nd T20: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) यांच्यात कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल (Manuka Oval) स्टेडियमवर दुसरा टी-20 सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाज करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघानं ऑस्ट्रलियासमोर 179 लक्ष्य ठेवलंय. इंग्लंडकडून डेविड मलाननं (Dawid Malan) 49 चेंडत 82 धावांची धमाकेदार खेळी केली. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना इंग्लंडनं जिंकलाय. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच आहे.
ट्वीट-
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडच्या डावातील चौथ्या चषकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार जोस बटलर आऊट झाला. त्यानंतर पाचव्या षटकातील पहिल्या चेंडूवर एलेक्स हेल्सनं माघारी परतला. इंग्लंडच्या संघानं अवघ्या 21 धावांवर दोन विकेट्स गमावल्या. बेन स्टोक्सही स्वस्तात माघारी परतला.त्यानंतर हॅरी ब्रुकच्या रुपात इंग्लंडच्या संघाला चौथा धक्का लागला. इंग्लंडच्या संघानं 54 धावांत चार विकेट्स गमावल्यानंतर डेविड मलान आणि मोईन अलीनं पाचव्या विकेट्ससाठी 92 धावांची महत्वाची भागेदारी केली. ज्यामुळं इंग्लंडच्या संघानं सामन्यात कमबॅक केलं. मोईन अलीनं 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली.ज्यात चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.
संघ-
ऑस्ट्रेलियाचा संघ:
डेविड वॉर्नर, आरोन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेजलवूड.
इंग्लंडचा संघ:
जोस बटलर (कर्णधार, विकेटकिपर) अॅलेक्स हेल्स, डेविड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक्स, मोईन अली, सॅम करन, डेविड व्हॅली, ख्रिस जॉर्डन, अदील रशीद, रिस टोप्ले.
हे देखील वाचा-