पर्थ : ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी पर्थमध्ये आजपासून सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या वादळी माऱ्यापुढं दोन्ही संघांचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 172 धावांवर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी देखील प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाची अवस्था पहिल्या दिवसअखेर 9 बाद 123 अशी केली आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मिशेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्यापुढं इंग्लंडचा संघ 172 धावांवर बाद झाला. मिशेल स्टार्कनं 7 विकेट घेतल्या.
Mitchell Stack : मिशेल स्टार्कचा वादळी मारा
मिशेल स्टार्कनं पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जॅक क्रॉलीला बाद केलं. क्रॉलीला खातं उघडता आलं नाही. बेन डकेटनं 20 धावा केल्या. तर, जो रुटला देखील खातं उघडतं आलं नाही. इंग्लंडनं 39 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. ओली पोप आणि हॅरी ब्रुक या दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. हॅरी ब्रूकनं 52 आणि ओली पोपनं 46 धावा केल्या. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर पुढच्या 12 धावांवमध्ये इंग्लंडनं पाच विकेट गमावल्या आणि इंग्लंडचा संघ 172 धावांवर बाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा जोफ्रा आर्चरनं डावाच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलच्या जॅक वेदाराल्डला शून्यावर बाद केलं. जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्सनं घात गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या. स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन चागंली फलंदाजी करु शकले नाहीत,. ऑस्ट्रेलियानं 31 धावांवर चार विकेट गमावल्या. ट्रेविस हेड आणि कॅमेरुन ग्रीन यांनी 45 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रेविस हेड 21 धावा आणि कॅमेरुन ग्रीन 24 धावा करुन बाद झाला.
पहिल्या दिवशी 19 विकेट
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यापुढं इं ग्लंडचा संघ 172 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासाठी मिशेल स्टार्कनं 7 विकेट घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियानं 9 बाद 123 धावा केल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्सनं ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला बाद केलं. यानंतर बेन स्टोक्सनं ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील आणि तळाच्या फलंदाजांच्या पटापट विकेट घेतल्या. स्टोक्सनं 5 विकेट घेतल्या आहेत.