Asia Cup 2023 : श्रीलंकामध्ये सध्या आशिया चषकाचा थररार सुरु आहे. पण पावसामुळे सामने प्रभावित होत आहेत. काही सामने रद्दही करावे लागले. पावसामुळे सुपर 4 चे सामनो कोलंबो येथे शिप्ट करण्यात आले. पण कोलंबोमध्येही पावसाने धुवांधार बॅटिंग सुरु केली आहे. फायनलला जर पाऊस आला तर काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. महत्वाचं म्हणजे, आशिया चषकाच्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. त्यामुळे जर फायनलचा सामना पावसामुळे धुतला गेला तर दोन्ही संघाना जेतेपद दिले जाईल.

आशिया चषकाची फायनल 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. फायनल सामन्याला राखीव दिवस न ठेवल्यामुळे आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. श्रीलंकामध्ये पावसाने सध्या दमदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळधार पडत आहेत. त्यामुळे भारतीय संघाला इनडोअर सराव करावा लागला. पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आरोप केला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने म्हटलेय की, श्रीलंकामध्ये पावसामुळे अनेक सामने प्रभावित होतात. त्यामुळे आशिया चषकाचे आयोजन यूएईमध्ये करायचे होते. पण एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी यूएईच्या ऐवजी श्रीलंका निवडले. 

कुठून सुरु झाला वाद - 

आशिया चषकाच्या यजमानपदावरुन वाद सुरु झाला. यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर यजमान पाकिस्तान संघाने पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अखेर हायब्रिड मॉडेलला मंजूरी देण्यात आली. हायब्रिड मॉडेलनुसार, पाकिस्तानमध्ये चार आणि श्रीलंकामध्ये नऊ सामने आयोजित करण्यात आले. भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये घेण्यात आले. दरम्यान, आशिया चषकातील साखळी फेरीचे सामने संपले आहेत. आफगाणिस्तान आणि नेपाळ संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. अ गटामधून भारत आणि पाकिस्तान तर ब गटामधून श्रीलंका आणि बांगलादेश संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. 

भारताचे सुपर 4 फेरीचे वेळापत्रक - 

ग्रुप अ आणि ब मधील आघाडीचे दोन संघ सुपर 4 साठी पात्र होतील. ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये पात्र झाले आहेत. ग्रुप ब मध्ये श्रीलंका आणि बांगलादेश संघाने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे.  सुपर 4 मध्ये प्रत्येक संघाचे तीन सामने होणार आहेत. आघाडीच्या दोन संघामध्ये फायनलचा थरार होणार आहे.  10 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. दुसरा सामना 12 सप्टेंबर रोजी आणि अखेरचा लाममा 15 सप्टेंबर रोजी होणार आहे.  

पाहा सुपर 4 फेरीचे वेळापत्रक

6 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) पाकिस्तान vs बांगलादेश लाहोर, पाकिस्तान दुपारी 3 वाजता
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) श्रीलंका vs बांगलादेश कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) पाकिस्तान vs टीम इंडिया कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) टीम इंडिया vs श्रीलंका कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) पाकिस्तान vs श्रीलंका  कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) टीम इंडिया vs बांगलादेश कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका दुपारी 3 वाजता