कोलंबो : आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) सर्वात कमी धावा करण्याचा (Asia Cup Lowest Score) लाजीरवाणा विक्रम श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) नावावर झाला आहे. या आधी हा विक्रम बांगलादेशच्या नावावर होता. आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्या श्रीलंकेनं नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेचे सर्व गडी अवघ्या 50 धावांवर बाद झाले. टीम इंडियाच्या गोलंदाजांची भेदक मारा करत अवघ्या 15.2 षटकात श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला तंबूत परत पाठवले. आशिया चषकात सर्वात कमी धावसंख्या करून सर्वबाद होण्याचा नकोसा विक्रम आता श्रीलंकेच्या नावावर झाला आहे.


श्रीलंकेच्या नावावर लाजीरवाणा विक्रम! 


आशिया कपमध्ये (Asia Cup Final) सर्वात कमी धावसंख्येचा लाजीरवाणा विक्रम श्रीलंकेच्या (Sri Lanka) नावावर आहे. श्रीलंका संघाचा डाव 50 धावांवर आटोपला. याआधी आशिया कपमध्ये सर्वात कमी धावांचा विक्रम बांगलादेशच्या नावावर होता. बांगलादेश संघ 87 धावांवर ऑलआऊट झाला होता. 



23 वर्षांनंतर रचला नकोसा विक्रम


आशिया चषकामध्ये (Asia Cup 2023) सर्वात कमी 50 धावसंख्या आता श्रीलंकेच्या नावावर आहे. 2000 चा बांगलादेशचा विक्रम श्रीलंकेनं 2023 मध्ये तब्बल 23 वर्षांनी मोडला आहे. त्यानंतर सर्वात कमी धावसंख्येच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आहे. आशिया कप 2000 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात बांगलादेश संघाचा डाव 87 धावांवर गुंडाळला होता. एकदिवसीय आशिया कपमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम बांगलादेशच्या नावावर आहे. हा संघ 2 जून 2000 रोजी ढाका येथील बांगलादेशच्या घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध केवळ 87 धावांत आटोपला होता. पाकिस्तानने हा सामना 233 धावांनी जिंकला.


आशिया चषकात तिसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या देखील बांगलादेशच्या नावावर आहे. 31 मार्च 1986 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने 94 धावा केल्या होत्या. हा सामना देखील पाकिस्तानने जिंकला होता. चौथ्या क्रमांकावर श्रीलंका आहे. 8 एप्रिल 1984 रोजी शारजाह येथे भारताविरुद्ध श्रीलंकेचा डाव 96 धावांत आटोपला होता. भारताने हा सामना 10 विकेटने जिंकला होता.


एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्येच्या यादीच पाचव्या क्रमांकावर बांगलादेश आहे.  27 जुलै 1988 रोजी भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेश संघाने 99 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने जिंकला होता.






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Asia Cup 2023 : अखेर 24 वर्षांनंतर टीम इंडियानं घेतला बदला! भारतानं श्रीलंकेला अवघ्या 50 धावांवर गुंडाळलं, 1999 मध्ये काय घडलं होतं?