Asia Cup 2023 Final : कोलंबो येथे सुरु असलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. सिराज आणि हार्दिकच्या माऱ्यापुढे श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांत आटोपला. मोहम्मद सिराज याने सहा फलंदाजांना तंबूत धाडले तर हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली. आशिया चषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला अवघ्या ५१ धावांचे आव्हान आहे. 


कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर मोहम्मद सिराज नावाचे वादळ आले होते. या वादळापुढे गतविजेत्या श्रीलंकेने लोटांगण घातले. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सिराज याने भेदक मारा केला.  सिराजच्या माऱ्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. मोहम्मद सिराज याने आघाडीच्या सहा श्रीलंकन फलंदाजांना तंबूत धाडले. तर हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह याने एक विकेट घेतली. श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांवर आटोपला. श्रीलंकेच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.  


श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांन लोटांगण घातले. जसप्रीत बुमराह याने विकेट घेत भारताला दमदार सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर मोहम्मद सिराज याने एकापाठोपाठ एक सहा विकेट घेतल्या. सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या दहा षटकांच्या आत पाच विकेट घेण्याचा पराक्रम झालाय. असा पराक्रम करणारा सिराज एकमेव भारतीय गोलंदाज आहे.  हार्दिक पांड्या याने अखेरच्या तीन फलंदाजांन तंबूचा रस्ता दाखवला.






टीम इंडियाने श्रीलंकेला 50 रन्सवर ऑल आऊट केले. मोहम्मद सिराजने भारतासाठी दमदार गोलंदाजी केली. त्याने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. सिराजनेही एक षटक मेडन टाकले. हार्दिक पांड्याने 2.2 षटकात 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने 5 षटकात 23 धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. हेमंताने 13 धावा केल्या.  इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.  श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्यावर बाद झाले. तर चार फलंदाजांन दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. निसांका २, परेरा ०, समरविक्रमा ० असंलका ०, डी सल्वा ४ आणि शनाका ० धावांवर तंबत परतले. आघाडीच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.