Asia Cup 2022 Ticket Sales Begin August 15: आशिया चषक 2022 सुरू होण्यासाठी आता दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. येत्या 14 ऑगस्ट 2022 पासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. महत्वाचे म्हणजे, या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील प्रेक्षकांना प्रचंड उस्तुकता लागली आहे. यातच भारत-पाकिस्तान यांच्या सामन्यातील तिकीट विक्रीला कधी सुरुवात होणार आहे? याबाबत महत्वाची माहिती समोर आलीय.

आशियाई क्रिकेट परिषदेनं ट्विटरच्या माध्यमातून तिकीट बुकिंगची तारीख जाहीर केलीय. परिषदेनं ट्विटमध्ये वेबसाइटची लिंकही दिली आहे. ज्याद्वारे क्रिकेट प्रेमींना तिकीट बुक करता येईल. महत्वाचं म्हणजे, 15 ऑगस्टपासून तिकीट विक्रीला  सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.  भारत आणि पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांना नेहमीच जास्त मागणी असते. 23 ऑक्टोबर रोजी एमसीजी येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी टी-20 विश्वचषक सामन्यासाठी सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत.

आशिया चषकाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणार आहे. दरम्यान, सुपर 4 साठी 6 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना 3 सप्टेंबरला शारजहामध्ये होणार आहे. तर त्याचा शेवटचा सामना 9 सप्टेंबरला म्हणजे फायनलच्या दोन दिवस आधी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. सुपर फोरमधील पहिला सामना वगळता बाकीचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.

आशिया चषकाचं संपूर्ण वेळापत्रक-

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-