Ashish Nehra on T20 Captain: टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्याने विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला. विराटच्या घोषणेनंतर भारतीय टी-20 संघाचा नवा कर्णधार कोण असणार? याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अनेक माजी क्रिकेटपटू भारताच्या नव्या कर्णधाराबाबत त्यांचे मत मांडत आहेत. यातच भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराने (Ashish Nehra) आपली निवड सांगितलीय.


आशिष नेहरानं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे टी-20 संघाचं कर्णधार पद सोपवण्यात यावं, अशी ईच्छा व्यक्त केलीय. बुमराह हा एकमेव खेळाडू आहे, जो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे, असंही त्यानं म्हटलं आहे. 


आशिष नेहराने काय म्हटलंय?


"भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पंत भारतीय संघासोबत अनेक देशांचा दौरा केलाय. मात्र, या दौऱ्यांमध्ये त्याला संघातून वगळण्यात आले. दुसरीकडे मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याऐवजी केएल राहुलला संधी मिळाली. यामुळे अशा परिस्थितीत बुमराह एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटच्या संघांमध्ये सहभाग असत. क्रिकेटच्या नियम पुस्तकात कुठंही असं लिहिलेलं नाही की गोलंदाज संघाचा कर्णधार होऊ शकत नाही", असं आशिष नेहरानं म्हटलंय.


टी-20 संघाचा कर्णधार म्हणून विराटची कामगिरी-


विराट कोहलीनं आतापर्यंत 47 सामन्यात भारताचे कर्णधारपद संभाळलंय. विराटच्या नेतृत्वात भारताने 29 सामने जिंकले आहेत. तर, 14 सामन्यात पराभव स्वीकारवा लागलाय. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखील भारतीय संघाने टी-20 फॉरमेटमध्ये 67.44 टक्के विजय मिळवलाय. मात्र, विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून धावा करण्यात देखील अपयशी ठरलाय. कसोटीमध्ये तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असला तरी एकदिवसीय आणि टी-20 मध्ये त्याच्या नेतृत्वावर टीका केली जातेय.



हे देखील वाचा-