T20 WC, ENG vs SA : दुबईमध्ये सुरु असलेला टी-20 विश्वचषक अखेरच्या टप्यात पोहचला आहे. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. पण नेट रनरेटच्या आधारावर इंग्लंड संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालं आहे. इंग्लंड संघानं पाच सामन्यापैकी चार सामन्यात विजय मिळवत 8 गुण मिळवले आहेत. अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. रन रेट कमी असल्यामुळे 8 गुण असतानाही दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य फेरीत पोहचता आलं नाही. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका याच्यात झालेल्या अखेरच्या सामन्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला. दक्षिण आफ्रिका संघानं प्रथम फलंदाजी करताना 189 धावांचा डोंगर उभा केला होता. इंग्लंड संघ 179 धावांपर्यंत मजल मारु शकला. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या आवाहनाचा पाठलाग करताना मैदानार घडलेल्या एका घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉय दुखापतग्रस्त झाला होता. त्याला इतक्या वेदना होत होत्या की, मैदानावर त्याला अश्रू रोखता आले नाहीत. मैदानावर तो रडत होता. जेसन रॉयची स्थिती पाहून चाहते भावूक झाले होते. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   


190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामी फलंदाजांनी ताबोडतोब सुरुवात करुन दिली होती. पहिल्या चार षटकांत दोघांनीही 37 धावा चोपल्या होत्या. त्यानंतर केशव महराजच्या षटकांत धाव घेतल्यानंतर जेसन रॉयचा पाय अचानक दुखू लागला. वेदनांनी तो विहळत होता. मैदानावरच तो झोपला. जेसन रॉयला आपले अश्रूही रोखता आले नाहीत. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला. पण आपल्याला यापुढे विश्वचषकात खेळता येणार नाही, त्यामुळे त्याला जास्त वेदना होत होत्या. या सर्व घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्रीडा चाहतेही भावूक झाले आहेत.





































इंग्लंडचा 10 धावांनी पराभव -


स्सी वॅन डेर डूसेन याच्या नाबाद 94 धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिकानं इंग्लंड संघासमोर 190 धावांचं लक्ष ठेवलं होतं. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात 189 धावांपर्यंत मजल मारली होती. डूसेन आणि मार्करम यांनी केलेल्या 52 चेंडूत 103 धावांच्या भागिदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघानं 189 धावा बनवल्या. इंग्लंडकडून आदिल रशीद आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. 190 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक राहिली. मधल्या फळीतील फलंदाज मोईन अलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मोईन अलीनं 37 धावांची खेळी केली. त्याशिवाय मलान 33, मॉर्गन 17 यांनीही योगदान देम्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण अफ्रीकाकडून रबाडाने 3, ड्वेन प्रीटोरियस आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.