Arshin Kulkarni Century Vijay Hazare Trophy : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावानंतर लखनऊ सुपर जायंट्सचा संघ खूपच तगडा दिसत आहे. या संघात ऋषभ पंत, निकोलस पूरन, डेव्हिड मिलर आणि एडेन मार्करामसारखे स्टार खेळाडू आहेत. त्याच वेळी, गोलंदाजीत आवेश खान, आकाशदीप, शमर जोसेफ आणि मयंक यादव सारखे प्रतिभावान खेळाडू कहर करताना दिसतील. पण दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीमध्ये लखनऊचा एक खेळाडू धमाक्यावर धमाका करत आहे. या खेळाडूचे नाव अर्शिन कुलकर्णी आहे, ज्याने महाराष्ट्रासाठी शतक ठोकून चमत्कार केला.
महाराष्ट्रासाठी अर्शिन कुलकर्णीचा हा पहिला सामना होता आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावलेले. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये लखनऊसाठी एक उत्तम सलामीवीर फलंदाज म्हणून तो उदयास येऊ शकतो. शनिवारी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात पंजाबविरुद्धच्या सामन्यात कुलकर्णीने 137 चेंडूत 104 धावा केल्या. या डावात त्याने एकूण 14 चौकार मारले. त्याने अंकित बावणेसोबत 145 धावांची भागीदारी केली आणि महाराष्ट्राला 275 धावांचा टप्पा गाठण्यात योगदान दिले.
ऋषभ पंतसोबत ओपनिंग करू शकतो का?
अर्शिन कुलकर्णीने या डावात 78 च्या स्लो स्ट्राईक रेटने फलंदाजी केली असली तरी, त्याने आयपीएल 2025 साठी एलएसजीला नवीन स्वप्ने दाखवण्याचे काम निश्चितच केले आहे. या शतकी खेळीपूर्वी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही धावांचा पाऊस पाडला होता. त्या टी-20 स्पर्धेत त्याने 6 सामने खेळले. 137 चा स्ट्राईक रेट आणि 32 च्या सरासरीने 194 धावा केल्या.
या उत्कृष्ट आकडेवारीच्या आधारे तो आयपीएलमध्ये एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन किंवा अगदी ऋषभ पंत यांच्यासोबत सलामीची भूमिका मिळवू शकतो. कुलकर्णी हा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे आणि त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सहा विकेट्स घेतल्या आहेत.
हे ही वाचा -