Arshdeep Singh in IND vs SL 2nd T20 : पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा (IND vs SL) 16 धावांनी पराभव केला. या विजयानंतर श्रीलंगा संघाने तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दरम्यान या सामन्यात भारताचा पराभव करण्यासाठी भारताच्या गोलंदाजांची खराब गोलंदाजी कारणीभूत ठरली. विशेष म्हणजे संघाचा युवा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने एक नकोसा रेकॉर्ड नावावर केला आहे. अर्शदीपने सर्वाधिक म्हणजे 5 नो बॉल टाकले. त्यामुळे संघाला मोठा तोटा झाला, विशेष म्हणजे टी20 इंटरनॅशनलमध्ये नो बॉलची हॅट्ट्रिक करणारा अर्शदीप हा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.
नो बॉलची हॅट्ट्रिक
श्रीलंकेची फलंदाजी सुरु होताच दुसरं षटक अर्शदीप टाकायला आला. यावेळी कुसल मेंडिस त्याच्यासमोर होता. त्याने पहिले पाच चेंडू 5 धावा दिल्या. पण सहावा चेंडू नो बॉल टाकला. यानंतर त्याने सलग आणखी दोन नो बॉल टाकले. अशा प्रकारे अर्शदीपने नो बॉल्सची हॅट्ट्रिक केली. या अतिरिक्त तीन चेंडूंवर त्याने 14 धावा दिल्या. अर्शदीपने पहिल्या षटकात एकूण 19 धावा दिल्या. त्यानंतर संपूर्ण सामन्यात 5 नो बॉल टाकले होते. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एका सामन्यात 5 नो बॉल टाकणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला. याआधी न्यूझीलंडच्या हॅमिश रदरफोर्डने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 नो बॉल टाकले होते.
अर्शदीपने 14 वेळा ओव्हरस्टेपिंग केले
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपने भारतासाठी 22 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 14 वेळा ओव्हरस्टेप करताना नो बॉल फेकला. यावरून अर्शदीपच्या नो बॉलची समस्या भारतासाठी बेसएक चिंतेचा विषय असल्याचं दिसून येत आहे. त्याच्या या नो बॉलबद्दल बोलताना टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने देखील चिंता व्यक्त केली. सामन्यानंतर बोलताना हार्दिक म्हणाला, एक दिवस तुमच्यासाठी चांगला असू शकतो. एक दिवस तुमच्यासाठी वाईट असू शकतो. पण साध्या चूका करता कामा नये. सध्या परिस्थिती अर्शदीपसाठी खूप कठीण आहे. दुसऱ्या टी20 मध्ये भारताकडून एकूण सात नो बॉल टाकण्यात आले, ज्यावर 22 धावा झाल्या. अशा प्रकारे टीम इंडियाची खराब गोलंदाजी दुसऱ्या टी-20 मध्ये भारताच्या पराभवास कारणीभूत ठरली, असं पांड्या म्हणाला.
हे देखील वाचा-