Arjun Tendulkar Duleep Trophy 2025 News : सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या सानिया चंडोकसोबतच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान, गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा अर्जुन तेंडुलकरला यंदाच्या दिलीप ट्रॉफीत खेळता येणार नाही. भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात 28 ऑगस्टपासून होत आहे. या हंगामातील पहिले स्पर्धा म्हणजेच दिलीप ट्रॉफी, ज्यामध्ये यंदा सहा संघ उतरतील. या स्पर्धेसाठी अर्जुन तेंडुलकरला नॉर्थ-ईस्ट झोन संघात संधी मिळण्याची अपेक्षा होती, पण तो यंदाच्या दिलीप ट्रॉफीत खेळताना दिसणार नाही.
अर्जुन तेंडुलकरला का मिळाली नाही संधी?
गेल्या रणजी हंगामात गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने प्लेट ग्रुपच्या 4 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आणि या संघाने प्लेट डिव्हिजनचे विजेतेपदही जिंकले. अर्जुन 2022/23 हंगामापासून गोव्यासोबत आहे आणि या अष्टपैलू खेळाडूने गोव्यासाठी एक संस्मरणीय पदार्पण केले आणि डिसेंबर 2023 मध्ये त्याच्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात शतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आतापर्यंत 37 विकेट्स आणि 532 धावा आहेत.
याशिवाय, नोव्हेंबर 2022 मध्ये गोव्याकडून लिस्ट ए मध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 18 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत आणि 102 धावा केल्या आहेत. गोव्यात जाण्यापूर्वी त्याने मुंबईकडून टी-20 मध्ये पदार्पण केले. अर्जुनने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे आणि तो 2021 पासून मुंबई इंडियन्स सोबत आहे.
दिलीप ट्रॉफी 2025 वेळापत्रक
नॉर्थ-ईस्ट झोनचा पहिला सामना ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील सेंट्रल झोनविरुद्ध होणार आहे. स्पर्धेचा फायनल 11 ते 15 सप्टेंबरदरम्यान होईल. सर्व सामने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळले जाणार आहेत. दुलीप ट्रॉफी 2025 साठी नॉर्थ-ईस्ट झोनचा संघ
जोनाथन रोंगसेन (कर्णधार), आकाश कुमार चौधरी, तेची डोरिया, यमनुम करंजीत, सेदेझाली रूपेरो, आशिष थापा, हेम बहादूर छेत्री, जेहू अँडरसन, अर्पित सुभाष भटेवरा, फिरोजम जोतिन सिंग, पलजोर तमांग, अंकुर मलिक, बिश्वरजित सिंग कोन्थौजम, आर्यन बोराह, लामाबम अजय सिंग.
स्टँडबाय खेळाडू : कांशा यांगफो, राजकुमार रेक्स सिंग, बॉबी जोथनसांगा, दिपू संगमा, पुख्रुम्बम प्रफुल्लमणी सिंग, ली योंग लेपचा, इमलीवाती लेमतूर.
हे ही वाचा -