Mercedes-Benz AMG:  दोन वेळा आयपीएलची जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला आयपीएलच्या पंधराव्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, कोलकात्याच्या वेगवान गोलंदाज आंद्रे रसलनं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वांना प्रभावित केलंय. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये दमदार प्रदर्शन केलंय. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकात्याच्या संघानं आंद्रे रसलला 12 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. आयपीएल 2022 संपल्यानंतर आता रसेलनं स्वतःला एक अप्रतिम भेट दिली. त्यानं स्वत:साठी मर्सिडीज-बेंझ एएमजी कार खरेदी केलीय.


आंद्रे रसलची इन्स्टाग्राम पोस्ट
रसेलनं त्याच्या इन्स्टाग्राम नुकतीच एक पोस्ट केलीय. ज्यात त्यानं मर्सिडीज-बेंझ एएमजी कारचा फर्स्ट लूक शेअर केलाय. या पोस्टमध्ये तो कारमध्ये शिरताना दिसत आहे.या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यानं असं लिहिलंय की, "मी नेहमीच मोठी स्वप्ने पाहतो! परिश्रम आणि त्यागानं स्वप्न सत्यात उतरतात."आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. माहितीनुसार, रसलच्या या नव्या कारची किंमत 2 कोटी इतकी आहे. नवीन कार घेतल्याबद्दल रसेलचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवपासून ते ख्रिस गेल आणि डॅरेन सॅमीपर्यंत सर्वांनी त्याचे अभिनंदन केलंय.


आयपीएल 2022मध्ये आंद्रे रसलची कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आंद्रे रसलनं कोलकात्यासाठी 174.5 च्या स्ट्राईक रेटनं  335 धावा घेतल्या आहेत. तर, 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं स्वबळावर कोलकात्याला अनेक सामने जिंकून दिले आहेत. कोलकात्याला यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. 


व्हिडिओ-



हे देखील वाचा-