Ajit Agarkar On Hardik Pandya : आयपीएलमध्ये खराब कामिगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं विश्वास दाखवला आहे. हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आलं बीसीसीआयच्या या निर्णायामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदही दिलं, त्यावरुन टीका झाली. याबाबत अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हार्दिक पांड्यामुळे संघ संतुलित होतो. फक्त उपकर्णधारपदाचा विषय नाही. खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याच्या जागी दुसरा खेळाडू निवडणं कठीण आहे, असे अजित आगरकर यांनी सांगितलं.
हार्दिक पांड्यामुळे संघ संतुलित होतो, कर्णधाराला जास्त पर्याय मिळतात, दुसरा खेळाडू निवडणं कठीण असे अजित आगरकरने सांगितलं. अजित आगरकर म्हणाला की, उपकर्णधारपदाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. हार्दिक पांड्याने क्रिकेटपटू म्हणून काय केले, हे सर्वांना माहितेय. खेळाडू म्हणून त्याला बदलणे कठीण आहे. हार्दिक पांड्यामुळे कर्णधारालाही बरेच पर्याय उपलब्ध होत आहे. तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीर्घ विश्रांतीनंतर परत येत आहे.
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे, तो संघाचा उपकर्णधारही आहे. पण हार्दिक पांड्याला अद्याप फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पांड्याला नऊ सामन्यात 197 धावा करता आल्या. त्याशिवाय गोलंदाजीत फक्त चार विकेट घेता आल्या. गोलंदाजीमध्ये धावाही रोखता आल्या नाहीत. हार्दिक पांड्याआधी रोहित शर्मा मुंबईच्या संघाचा कर्णधार होता. पण यंदा ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. पांड्याला त्यामुळेही ट्रोलर्सचा सामना करावा लागला. त्याशिवाय कामगिरीतही तो फ्लॉप गेलाय. तरीही बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवलाय.
पांड्याला टीम इंडियात मोठी जबाबदारी -
हार्दिक पांड्याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची अनेक कारण आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्यानं दमदार प्रदर्शन केलेय. पांड्याचा अनुभव भारतासाठी फायदाचा ठरेल. आयसीसी स्पर्धेमध्ये खेळण्याचा पांड्याकडे मोठा अनुभव आहे. त्यानं अनेकदा मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. त्यामुळेच पांड्यावर बोर्डानं विश्वास दाखवत उपकर्णधारपद सोपवलं आहे.
पांड्याचं आंतरराष्ट्रीय करिअर -
हार्दिक पांड्यानं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्यानं प्रभावी कामगिरी केली आहे. पांड्याने 92 सामन्यात 1348 धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय 73 विकेटही घेतल्या आहे