संगमनेर : तब्बल तीन दशकानंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली. त्याचा आनंद ऑस्ट्रेलियापासून सातासमुद्रापार असलेल्या अजिंक्य रहाणेच्या मूळगावी संगमनेरमध्येही करण्यात आला. वयोवृद्ध आजीने आपल्या नातवाला मिळालेल्या यशानंतर कुटुंबियांना पेढे वाटप करत आनंद व्यक्त केला.


संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी हे नाशिक पुणे महामार्गा लगतच गाव. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच मुळगावचा. अजिंक्यचा जन्म संगमनेर तालुक्यातील आश्वी या मामाच्या गावी झाला आणि त्यानंतर वडिलांच्या नोकरी निमित्त आईवडिल व अजिंक्य मुबंई त स्थायीक झाले. मात्र, आजही अजिंक्यची आजी झेलूबाई, चुलते सीताराम व चुलती लक्ष्मीबाई हे चंदनापुरी गावातच वास्तव्य करतात. आज ऑस्ट्रेलियन भूमीवर तब्बल तीन दशकानंतर इतिहास रचत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली आणि त्याचा आनंद अजिंक्यच्या मूळगावी करण्यात आला. आजीने आपल्या कुटुंबातील सदस्यांना पेढे भरवीत आनंद साजरा केला तर ग्रामस्थांनी मूळगावी असलेल्या घराबाहेर फटाके फोडत विजयाचा जल्लोष केला.


India Gabba Test Win Historic | गाबामध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, 1988 नंतर पहिला पराभव


ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण
भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये 33 वर्षांपासून कधीही पराभूत झालेला नव्हता आणि भारताविरुद्ध गाबाच्या मैदानात एकही सामना गमावलेला नव्हता. परंतु, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केलं. भारताने ही कसोटी तीन विकेट्सनी जिंकली.


ऑस्ट्रेलियन संघासाठी ब्रिस्बेनचं गाबा मैदान एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियाला त्या मैदानात पराभूत करणं अशक्य असल्याचं म्हटलं जातं होतं. कारण 1988 पासून ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानात कधीही पराभूत झालेला नव्हता. शिवाय सुरुवातीला क्वॉरन्टीनमुळे जेव्हा भारतीय संघाने इथे खेळण्यास नकार दिला होता, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलियाची ब्रिस्बेनमधली कामगिरी शानदार आहे, त्यामुळेच भारतीय संघाला इथे खेळायचं नाही. परंतु रहाणेच्या नेतृत्त्वातील भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांची 'घमेंड' उतरवली.


अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने रचला इतिहास, अजिंक्य रहाणेच्या गावात फटाके फोडून जल्लोष!