Ajaz Patel: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमध्ये (Wankhede Stadium) खेळला जातोय. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने दुसऱ्या कसोटी सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा मानस आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या संपूर्ण भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलनं माघारी धाडून मोठा विक्रम रचलाय. एजाज पटेलनं भारताचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, आर आश्विन आणि उमेश यादवला शून्यावर बाद केलं. एजाजनं एक-एक भारताच्या दहाही फलंदाजांना तंबूत पाठवलं. या कामगिरीसह एजाज पटेलनं अनिल कुंबलेचा विक्रमाशी बरोबरी केलीय. 


भारत- न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एजाज पटेलनं मोठा विक्रम रचलाय. एजाज पटेलनं 47.5 षटकात 10 विकेट्स पटकावल्या आहेत. यात त्यानं 12 षटकं निर्धाव टाकलीत. तर 2.49 च्या सरासरीनं 119 धावा दिल्या आहेत. अनिल कुंबळेनं पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेतले होते.



भारत विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडकडून आक्रमक गोलंदाजी करणारा एजाज पटेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालीय. तसेच भारतीय फलंदाजांची घसरगुंडी पाहता नेटकऱ्यांनी आता प्रशिक्षक राहुल द्रविडला फलंदाजीला येण्याचा सल्ला दिलाय. तर, काहीजणांकडून अनिल कुंबळे आणि एजाज पटेल यांची तुलना केली जात आहे. 

















 


हे देखील वाचा-