Ajay Devgn Honored Shubman Gill : बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने (Ajay Devgan) भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) युवा सलामीवीर शुभमन गिलचा (Shubhman Gill) खास पुरस्कार देऊन गौरव केला. शुभमन गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियात स्थान पक्कं केले आहे. दरम्यान विराट कोहली फाउंडेशनने भारतीय क्रीडापटूंचा सन्मान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अजय देवगणने शुभमन गिल आणि नीरज चोप्रा यांच्यासह अनेक खेळाडूंचा सत्कार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


अजय देवगणने केला शुभमन गिलचा सन्मान


भारतीय खेळाडूंचा गौरव केल्यानंतर अजय देवगणने धन्यवाद व्यक्त करत, त्याने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने सोबत लिहिलं होतंकी, 'सर्वोच्च भारतीय खेळाडूंना हे पुरस्कार सादर करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. हे शक्य केल्याबद्दल भारतीय क्रीडा सन्मान आणि विराट कोहली फाउंडेशनचे आभार.' या कार्यक्रमात विराट कोहली, त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि अभिषेक बच्चन हे फिल्मी जगतातील प्रसिद्ध स्टार्स देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचाही गौरव केला.






शुभमनची वर्षभरातील कामगिरी उत्तम


भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या चार महिन्यांत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. जानेवारी 2023 ते मार्च या कालावधीत त्याने या 6 पैकी 5 शतके झळकावली आहेत. यादरम्यान, शुभमनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक, 2 शतके, कसोटी सामन्यात एक शतक आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये एक शतक झळकावण्यात यश मिळवले. शुभमन गिलने 2023 साली वनडेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षी वन-डे, टी20 नंतर या वर्षातील पहिलंच कसोटी शतकही त्यानं झळकावलं. त्यामुळे यंदाच्या वर्षात आणखी एक शानदार खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अहमदाबाद कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. यासह तो कांगारू संघाविरुद्ध सलामीवीर फलंदाज म्हणून शतक झळकावणारा भारताचा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.


हे देखील वाचा-